Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनीता हसनंदानीने अशा अवस्थेत केला 'हा' कारनामा, पतीसह चाहतेही संभ्रमात

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2019 14:42 IST

तिच्या सोशल मीडिया पेजवर ती याबाबतच्या सगळ्या अपडेट शेअर करत होती. तिचे फोटो पाहून ती खूप आनंदात असल्याचे पाहायला मिळाले. मात्र तिचा एक फोटो सा-यांनाच संभ्रमात टाकत आहे.

नुकतेच 'नागिन' फेम अनिताने ती प्रेग्नंट असल्याची गुड न्युज सोशल मीडियावर तिच्या चाहत्यांसह शेअर केली होती. पोस्ट शेअर करताच अनितावर शुभेच्छांचा वर्षाव सुरू झाला होता. पति रोहित रेड्डीच्या वाढदिवसाच्या दिवशीच तिने पती रोहितला शुभेच्छा देत ती जुळ्या मुलांची आई होणार असल्याचे सांगितले होते. तिच्या सोशल मीडिया पेजवर ती याबाबतच्या सगळ्या अपडेट शेअर करत होती. तिचे फोटो पाहून ती खूप आनंदात असल्याचे पाहायला मिळाले. मात्र तिचा एक फोटो सा-यांनाच संभ्रमात टाकत आहे. कोलाज केलेला हा फोटोत फेक बेबी बंम्प फ्लाँट करत असल्याचे पाहायला मिळत आहे. हा फोटो शेअर करत तिने म्हटले आहे की, ''जर फेक बेबी बंप दाखवत मी अशा प्रकारे कारनामे करू शकते तर जेव्हा  खरोखर आई बनेल तेव्हा मी काय करेन याचा अंदाज रोहितने लावावा''. प्रेग्नंसीला घेवून अनिता सध्या खूप सारे विनोदी पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत असल्याचे पाहायला मिळतंय. अनिता खरोखर गरोदर आहे का असा प्रश्न तिच्या चाहत्यांना पडला आहे. तर ती गरोदर नाहीये. हा सगळा तिच्या मालिकेच्या प्रसिद्धीसाठी घातलेला घाट आहे.  त्यामुळे प्रसिद्धीसाठी कलाकार कोणत्या थराला जातील हे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.

अनिताच्या प्रेग्नंसीच्या वावड्या उठणं ही काही पहिलीच वेळ नाहीय,यापूर्वीही तिने अशाच प्रकारे पोस्ट शेअर करत फॅन्सना आश्चर्य चकित केले होते.  छोट्या पाहुण्याच्या आगमनामुळे घरांतही प्रसन्न वातावऱण पाहायला मिळतंय. आता छोट्या पाहुण्याचीही जबाबदारी आली आहे. माझा  जास्त वेळ छोट्या पाहुण्याचे लाड पुरवण्यातच जात असतो. त्यावेळी बाळाला जन्म दिला असावा, म्हणून ती सध्या खूप खुष असेल असे फॅन्सना वाटले होते. मात्र दुसरा फोटो शेअर करताच तिच्या घरी आलेला छोटा पाहुणा हा एक छोटे कुत्र्याचे पिल्लु होते हे समोर आले होते.

त्यानंतर अनिताला प्राण्यांची खूप आवड असल्यामुळे सध्या ती या पिल्लुसह मजा मस्ती करताना दिसली. अगदी आईप्रमाणे ती त्याची काळजी घेत  होती. या पिल्लुमुळे एक नवीन जबाबदारी आल्यासारखे वाटत असून, मी एका आईसारखीच त्याची काळजी घेत आहे.अनिताने  तिचा आनंद तिच्या चाहत्यांबरोबर शेअर करण्यासाठी इंस्टाग्रामवर  फोटो आणि एक व्हिडीओही शेअर केला होता. 

टॅग्स :नागिन 3