Join us
Daily Top 2Weekly Top 5

'ॲनिमल' मधील रणबीरबरोबरच्या इंटिमेट सीन्सवर तृप्ती डिमरीने सोडलं मौन, म्हणाली, "सीन शूट करताना सेटवर..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 11:39 IST

'ॲनिमल'मध्ये तृप्तीने रणबीरबरोबर दिलेल्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा रंगली आहे. यावर आता पहिल्यांदाच तृप्तीने भाष्य केलं आहे. 

'ॲनिमल' हा बिग बजेट बॉलिवूड सिनेमा १ डिसेंबरला प्रदर्शित झाला. प्रदर्शित होताच या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. या सिनेमातील काही सीन्स आणि डायलॉगची प्रचंड चर्चा आहे. रणबीर कपूर, अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओल अशी तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमात मात्र अभिनेत्री तृ्प्ती डिमरी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. 'ॲनिमल'मध्ये तृप्तीने रणबीरबरोबर दिलेल्या इंटिमेट सीन्सची जोरदार चर्चा रंगली आहे. यावर आता पहिल्यांदाच तृप्तीने भाष्य केलं आहे. 

तृप्तीने 'ॲनिमल'मध्ये रणबीरबरोबर दिलेल्या इंटिमेट सीन्समुळे तिला ट्रोलही करण्यात येत आहे. याबाबत आता तृप्तीने मौन सोडलं आहे. ईटाइम्सला दिलेल्या मुलाखतीत तृप्ती म्हणाली, "मी बुलबुल सिनेमात दिलेला बलात्काराचा सीन यापेक्षा मला जास्त कठीण वाटला. कारण, तेव्हा तुम्ही काहीच करू शकत नाही. पण, काहीच करता न येणं हे कधीही धैर्य दाखवण्यापेक्षा जास्त कठीण असतं. त्यामुळे या सीनची तुलना होऊ शकत नाही." 

"या सीनवर टीकाही होत आहे आणि त्यामुळे मला अस्वस्थ वाटत आहे. जोपर्यंत मी यासाठी कम्फर्टेबल आहे. सेटवर माझ्या आजुबाजूचे लोक मला कम्फर्टेबल फील करून देत आहेत. मी योग्य गोष्टी करत आहे, याची मला खात्री आहे. तोपर्यंत मी हे करेन. कारण, एक अभिनेत्री आणि माणूस म्हणून मला या गोष्टींचा अनुभव घ्यायचा आहे," असंही तृप्ती म्हणाली.

रणबीरबरोबर इंटिमेट सीन कसा शूट झाला, याबाबत तृप्तीने या मुलाखतीत सांगितलं. ती म्हणाली, "तो सीन शूट करताना सेटवर  मी, रणबीर, संदीप सर आणि कॅमेरामॅन असे फक्त चार लोक होते. प्रत्येक पाच मिनिटांनी ते मला तू ठिक आहेस का? असं विचारत होते. जेव्हा तुमच्या आजुबाजूचे लोक तुम्हाला सपोर्ट करतात तेव्हा तुम्हाला वेगळं फिलिंग येत नाही. सेटवर नसणारे लोक किंवा हे सीन कसे शूट होतात? हे माहीत नसणारे प्रेक्षक याबाबत कोणत्याही प्रकारची कल्पना करू शकतात. पण, त्याने मला फरक पडत नाही. माझ्या पात्राची काय गरज आहे त्यानुसारच मी काम करेन." 

टॅग्स :रणबीर कपूरसिनेमासेलिब्रिटी