Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कपूरचा ६४वा वाढदिवस साजरा केला 'जुग जुग जियो'च्या सेटवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2020 13:07 IST

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आज ६४ वा वाढदिवस साजरा करत आहेत.

बॉलिवूड अभिनेता अनिल कपूर आज आपला ६४ वा वाढदिवस साजरा करत आहे. अनिल कपूर सध्या पंजाबमध्ये आगामी चित्रपट जुग जुग जियोच्या शूटिंगमध्ये बिझी आहे. त्यामुळे त्याने यंदाचा वाढदिवस चित्रपटाच्या सेटवरच साजरा केला. अनिल कपूरच्या वाढदिवसासाठी पत्नी सुनीता कपूर, वरुण धवन , कियारा आडवाणी आणि प्राजक्ता कोळी हे देखील उपस्थित होते. वरुण आणि कियारा यांनी वाढदिवसाच्या सेलिब्रेशनचा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर केला आहे. 

वाढदिवसा निमित्त अनिल कपूरने जुग जुग जियोच्या सेटवर एक छोटी पार्टी दिली. वाढदिवसाच्या सेलिब्रेशनच्या व्हिडिओमध्ये अनिल कपूर केक कापताना दिसत आहे. अनिल कपूर यांच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहते शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.

तर दुसरीकडे सोनम कपूरला वाढदिवसाच्या दिवशी वडिलांची खूप आठवण येते आहे.

सोनमने अनिल कपूर आणि तिचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर करत म्हटले की, सकारात्मक, तुम्ही दयाळू आहात आणि तुमच्या या गोष्टी आमच्यात आल्या आहेत. यामुळे आम्ही जास्त नशीबवान आहोत. मला तुमची खूप आठवण येते आहे.

अनिल कपूरच्या वाढदिवशीनिमित्त एके वर्सेज एके चित्रपट प्रदर्शित होणार आहे. हा कॉमिक थ्रिलर चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. चित्रपटात अनिल कपूरसोबत अनुराग कश्यप मुख्य भूमिकेत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विक्रमादित्य मोटवानी यांनी केले आहे.

टॅग्स :अनिल कपूरसोनम कपूरवरूण धवनकियारा अडवाणी