Join us
Daily Top 2Weekly Top 5

बॉलिवुड कलाकार आणि त्यांचे भन्नाट किस्से; बाथरुममध्ये आलियाबद्दल केली भविष्यवाणी; विजय वर्माने सांगितला अनिल कपूरचा किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 20, 2022 15:28 IST

बॉलिवुड कलाकार आणि त्यांचे किस्से एक से एक असतात. आता हेच बघा अनिल कपुर आणि विजय वर्मा बाथरुममध्ये काय भेटताता, आलियाबद्दल भविष्यवाणी काय करताता आणि ते खरंही होतं. 

बॉलिवुड कलाकार आणि त्यांचे किस्से एक से एक असतात. आता हेच बघा अनिल कपुर आणि विजय वर्मा बाथरुममध्ये काय भेटताता, आलियाबद्दल भविष्यवाणी काय करताता आणि ते खरंही होतं. 

आलिया भट्टचा 'गंगूबाई काठियावाडी' सिनेमाचं खूप कौतुक झालं. सिनेमाने चांगली कमाई केली. सर्वांनीच आलियाच्या अभिनयाचं कौतुक केलं. पण अनिल कपूरने थेट एक भविष्यवाणीच केली आणि पुढे ती खरीही ठरली.

काय होता नेमका किस्सा ?

नेटफ्लिक्सच्या 'डार्लिंग्स' सिनेमात आलियाचा सहकलाकार अभिनेता विजय वर्मानं  किस्सा सांगितला आहे. फिल्म कंपॅनियन मध्ये विजय सांगतो, ' गंगूबाई काठीयावाडीचे स्क्रीनिंग यशराजमध्ये होते. इंटरव्हल मध्ये मी बाथरुममध्ये गेलो. अनिल कपूरही तिथे आले. त्यांना मी पहिल्यांदाच बघत होतो. त्यांना बघून मी एकदम थबकलो. पण ते ओळख नसतानाही माझ्याशी बोलायला लागले. ते म्हणाले, पिक्चर मस्त सुरु आहे. ही मुलगी खूप चांगले काम करतेय. मग माझ्याकडे बघायला लागले. मी म्हणालो हो..हो. आता गप्पा इथे थांबत नाहीत.

स्क्रीनिंग संपल्यानंतर अनिल कपूर पुन्हा मला बाथरुममध्येच भेटले. माझ्याशी बोलायला आले, ' इतकं चांगलं काम नाही करायचं. इतकं छान काम करेल ना तर एक दिवस हॉलिवुडमध्ये जाईल. '

वेळेचीही कमाल बघा. अनिल कपूर यांची ही भविष्यवाणी खरी ठरली. फेब्रुवारीमध्ये गंगूबाई काठियावाडी रिलीज झाला आणि मार्चमध्ये नेटफ्लिक्सने आलियाच्या हॉलिवुड चित्रपटाची घोषणा केली. गॅल गॅडोट आणि जेमी डॉर्मन सोबत आलियाने 'हार्ट ऑफ स्टोन' या चित्रपटात काम केले आहे. 

टॅग्स :आलिया भटअनिल कपूरहिंदीसिनेमाहॉलिवूड