Join us
Daily Top 2Weekly Top 5

महेश बाबूच्या सिनेमात झाली 'झक्कास' बॉलिवूड स्टारची एन्ट्री?, सिनेमा ब्लॉकबस्टर होण्याची चर्चा जोरात

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2020 11:31 IST

या सिनेमात महेश बाबूचा लूकही खास आणि वेगळा असणार आहे. याचा अंदाज पोस्टर रिलीज केल्यावर आला होता. आता या सिनेमाबाबत एक जबरदस्त बातमी समोर आली आहे.

साउथचा सुपरस्टार महेश बाबूचा आगामी सिनेमा 'सरकारू वारी पाटा'ची गेल्या काही दिवसांपासून चांगलीच चर्चा रंगली आहे. या सिनेमाची घोषणा झाल्यापासूनच याची महेश बाबूच्या फॅन्समध्ये कमालीची क्रेझ बघायला मिळत आहे. या सिनेमात महेश बाबूचा लूकही खास आणि वेगळा असणार आहे. याचा अंदाज पोस्टर रिलीज केल्यावर आला होता. आता या सिनेमाबाबत एक जबरदस्त बातमी समोर आली आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार महेश बाबूच्या या सिनेमात बॉलिवूड स्टार अनिल कपूरची एन्ट्री होऊ शकते.

मीडिया रिपोर्ट्सनुसार, सिनेमाचे दिग्दर्शक परशुरामने अनिल कपूर यांना सिनेमाची स्क्रीप्ट फोनवरच ऐकवली आहे. जी त्यांना फार आवडली आहे. अनिल कपूर यांनी सिनेमाला होकार दिल्याचेही समजते. अशी माहिती आहे की, या सिनेमात अनिल कपूरला महेश बाबूच्या अपोझिट व्हिलनची भूमिका ऑफर करण्यात आली आहे. आता अनिक कपूर या सिनेमात काम करणार की नाही याची अधिकृत घोषणा बाकी आहे.

खास बाब ही आहे की, अनिल कपूरआधी या सिनेमातील व्हिलनच्या रोलसाठी कन्नड सुपरस्टार किच्चा सुदीपला अ‍ॅप्रोच करण्यात आलं होतं. किच्चा सुदीपने  याआधी सलमान खानचा सिनेमा दबंग ३ मध्ये व्हिलनची भूमिका साकारून प्रेक्षकांना इम्प्रेस केलं होतं. तसेच या सिनेमात अभिनेत्रीसाठीही वेगवेगळ्या नावांची चर्चा सुरू आहे. यात किर्ती सुरेश आणि कियारा अडवाणीच्या नावांची चर्चा आहे. पण अजून याबाबत अधिकृत घोषणा झालेली नाही. 

महेश बाबूच्या या सिनेमात जबरदस्त अ‍ॅक्शन धमाका असणार आहे. तसेच या सिनेमासाठी तेलुगूच नाही तर हिंदी आणि इतरही भाषांमधील स्टार घेण्याचा निर्मात्यांचा प्लॅन आहे. त्यामुळे हा सिनेमा हिंदीतही रिलीज केला जाऊ शकतो. 

हे पण वाचा :

OMG! महेश बाबूचा असा दणक्यात साजरा झाला वाढदिवस की विश्वविक्रम रचला गेला!!

साऊथचा सुपरस्टार महेश बाबूची व्हॅनिटी व्हॅन शाहरूखच्या व्हॅनपेक्षाही आहे महाग, किंमत वाचाल तर चक्रावून जाल...

टॅग्स :महेश बाबूअनिल कपूरबॉलिवूड