Join us

अनिल कपूरच्या पत्नीने एका अभिनेत्रीसोबत त्याला पकडले होते खोलीत, चिडून सोडले होते घर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2019 20:00 IST

एका अभिनेत्री आणि अनिलच्या अफेअरमुळे सुनीता आणि अनिल यांच्यात प्रचंड भांडणं झाली होती. एवढेच नव्हे तर सुनीता घर सोडून देखील गेली होती.

ठळक मुद्देएका चित्रपटाच्या सेटवर त्यांना दोघांना सुनीताने एकाच खोलीत पाहिले होते. या गोष्टीचा सुनीताला प्रचंड धक्का बसला होता आणि त्यामुळे ती मुलांना घेऊन घर सोडून निघून गेली होती.

अनिल कपूर गेल्या अनेक वर्षांपासून बॉलिवूडमध्ये एकाहून एक हिट चित्रपट देत आहे. आता त्याच्या पावलावर पाऊल ठेवून त्याची मुलगी सोनम आणि मुलगा हर्षवर्धन यांनी बॉलिवूडमध्ये एंट्री घेतली आहे. सोनमला तर प्रेक्षकांचे चांगले प्रेम देखील मिळत आहे. अनिल कपूरच्या अभिनयाइतकी त्याच्या फिटनेसची नेहमीच चर्चा केली जाते. अनिल आजही तरुण नायकांपेक्षाही हँडसम दिसतो असे सगळ्यांचेच म्हणणे आहे. अनिलला प्रचंड फॅन फॉलोव्हिंग असून त्याचे फॅन्स त्याला सोशल मीडियावर फॉलो करत असतात. अनिलच्या सोशल मीडियाच्या अकाऊंटवर अनेकवेळा त्याच्या कुटुंबियांचे फोटो तो पोस्ट करतो. त्याच्या अनेक फोटोत त्याची पत्नी सुनीता आपल्याला पाहायला मिळते. पण तुम्हाला माहीत आहे का, एका अभिनेत्री आणि अनिलच्या अफेअरमुळे सुनीता आणि अनिल यांच्यात प्रचंड भांडणं झाली होती. एवढेच नव्हे तर सुनीता घर सोडून देखील गेली होती.

किमी काटकरने ऐंशी-नव्वदच्या दशकात अनेक चित्रपटांमध्ये काम केले. किमी तिच्या अभिनयापेक्षा बोल्ड दृश्यांमुळे जास्त ओळखली जात असे. हम या चित्रपटात तिच्यावर चित्रीत करण्यात आलेले जुम्मा चुम्मा दे दे हे गाणे चांगलेच गाजले होते. अनिल आणि किमी यांनी आग से खेलेंगे, हमला, काला बाजार, सोने पे सुहागा यांसारख्या अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले होते. त्या काळात अनिल आणि किमीच्या अफेअरची चांगलीच चर्चा रंगली होती. 

पत्रिकाने दिलेल्या वृत्तानुसार, अनिल आणि किमीच्या अफेअरच्या बातम्या त्यावेळी अनेक वृत्तपत्रात येत होत्या. पण सुरुवातीला सुनीताने या सगळ्या गोष्टींकडे दुर्लक्ष केले होते. या सगळ्या केवळ अफवा असल्याचे सुनीताला वाटत होते. पण एका चित्रपटाच्या सेटवर त्यांना दोघांना सुनीताने एकाच खोलीत पाहिले होते. या गोष्टीचा सुनीताला प्रचंड धक्का बसला होता आणि त्यामुळे ती मुलांना घेऊन घर सोडून निघून गेली होती. पण काहीही केल्या अनिल सुनीताशिवाय राहायला तयार नव्हता. त्यामुळे अनिलने सुनीताची समजूत काढत तिला घरी परत आणले होते. 

 

 

टॅग्स :अनिल कपूरकिमी काटकर