Join us

इंडियन आयडलच्या सेटवर या कारणामुळे आले अनिल कपूरच्या डोळ्यांत अश्रू

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 26, 2020 13:55 IST

इंडियन आयडलच्या आगामी भागात मलंग चित्रपटाचे कलाकार अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी आणि कुणाल खेमू हजेरी लावणार आहेत.

ठळक मुद्देशानदार शाहजानने ‘एक लडकी को देखा’ आणि ‘जिंदगी हर कदम एक नई जंग’ या गाण्यांवर उत्कृष्ट सादरीकरण केले. त्याच्या सुमधुर आवाजाने अनिल कपूरचे डोळे पाणावले.

सोनी एन्टरटेनमेंट टेलिव्हिजनच्या इंडियन आयडल या कार्यक्रमाचे आजवरचे सगळेच सिझन हिट गेले आहेत. या कार्यक्रमाचा यंदाचा सिझन प्रेक्षकांना प्रचंड आवडला असून या कार्यक्रमातील सगळ्याच स्पर्धकांचे आवाज प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहेत. नेहा कक्कड, विशाल दादलानी आणि हिमेश रेशमिया या कार्यक्रमात परीक्षकाच्या भूमिकेत असून या कार्यक्रमाचा विजेता कोण ठरणार याची उत्सुकता सगळ्यांना लागली आहे.

 इंडियन आयडलच्या आगामी भागात मलंग चित्रपटाचे कलाकार अनिल कपूर, आदित्य रॉय कपूर, दिशा पटानी आणि कुणाल खेमू हजेरी लावणार आहेत. हे कलाकार आपल्या आगामी चित्रपटाचे प्रमोशन करताना दिसणार आहेत. इंडियन आयडलमधील सगळ्याच स्पर्धकांच्या गाण्याने ते भारावून जाणार आहेत.

शानदार शाहजानने ‘एक लडकी को देखा’ आणि ‘जिंदगी हर कदम एक नई जंग’ या गाण्यांवर उत्कृष्ट सादरीकरण केले. त्याच्या सुमधुर आवाजाने अनिल कपूरचे डोळे पाणावले.

 अनिल कपूरने त्याच्या ‘कर्मा’ या पहिल्या चित्रपटातील एक किस्सा या निमित्ताने सांगितला. तो म्हणाला, खरेखुरे गाणे म्हणणे किती कठीण असते हे मला ठाऊक आहे. जेव्हा ‘कर्मा’ चित्रपटातील गाण्यांपैकी एक गाणे ध्वनिमुद्रित होत होते तेव्हा सर्वांनी आग्रह केला की, हे गाणे माझ्या आवाजात रेकॉर्ड केले जावे. त्यावेळी मला कळले की, प्रत्यक्षात गाणं ही किती अवघड गोष्ट आहे. त्यानंतर मी लक्ष्मीकांत-प्यारेलाल यांच्याकडे गेलो आणि मी गाऊ शकत नाही अशी कबुली त्यांना दिली. मग मी किशोरदांच्या (किशोर कुमार) घरी गेलो आणि त्यांना या चित्रपटासाठी गाणी गाण्याची विनंती केली.

 हा किस्सा सांगताना अनिल कपूर म्हणाला, “मी किशोरदांच्या घरी गेलो आणि त्यांना समजावले की, ही माझ्या कारकिर्दीची सुरुवात आहे. माझ्या या बोलण्यानंतर किशोरदा ‘कर्मा’ची गाणी गाण्यासाठी तयार झाले. रफी साहेब, किशोरदा यांच्यासारख्या दिग्गजांसोबत काम करण्याचे मला भाग्य लाभले यासाठी मी स्वतःला नशिबवान समजतो.”

टॅग्स :अनिल कपूरइंडियन आयडॉलमलंग