Join us
Daily Top 2Weekly Top 5

अनिल कपूरवर संतापले महेश बाबूचे चाहते; पाहा नेमकं काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2023 18:10 IST

महेश बाबूची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील एक नावाजलेला अभिनेता म्हणून महेश बाबूचं नाव घेतलं जातं. त्याने त्याच्या दर्जेदार अभिनयाने प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. आजपर्यंत त्याने अनेक हिट चित्रपट दिले. महेश बाबूची त्याच्या चाहत्यांमध्ये प्रचंड क्रेझ आहे, हे अनेकदा दिसून आले आहे. अशातच महेश बाबूच्या चाहत्यांनी अभिनेता अनिल कपूरला ट्रोल केले आहे. 

हैद्राबादमधील मल्ला रेड्डी कॉलेज ऑफ इंजीनियरिंग येथे 'अ‍ॅनिमल' चा प्री रिलीज इव्हेंट नुकताच झाला. या इव्हेंटमध्ये महेश बाबूसह दाक्षिणात्य इंडस्ट्रीतील अनेक दिग्गज उपस्थित होते. या कार्यक्रमातील एक व्हिडीओ समोर आला आहे. ज्यामध्ये दिसते की, 'अनिल कपूर स्टेजसमोर बसलेल्या महेश बाबूला हाक मारतो. 

'तु मला नाही म्हणू शकत नाही. ही माझी ऑर्डर आहे. तू ये' अनिल कपूरच्या या विनंतीवर महेश बाबू स्टेजवर पोहोचतो. अनिल कपूर नाचू लागतो आणि महेशलाही नाचायला सांगतो. पण महेश बाबू अनिल कपूरला मिठी मारतो आणि स्टेजवरून खाली जातो'.  

अनिल कपूरने महेश बाबूला दिलेल्या वागणुकीमुळे चाहते चांगलेच संतापले आहेत.  अनिल कपूर आणि महेश बाबू यांचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. दरम्यान, अ‍ॅनिमल’ हा चित्रपट संदीप रेड्डी वांगा दिग्दर्शित क्राईम ड्रामा आहे.  १ डिसेंबर २०२३ रोजी सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. 

टॅग्स :महेश बाबूअनिल कपूरसेलिब्रिटी