Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: दोन वेळा अनन्याने बघितलं पण आलिया भटने मात्र साफ दुर्लक्ष केलं; फिल्मफेअर सोहळ्यात काय घडलं?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2025 15:22 IST

आलिया भट आणि अनन्या पांडेचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर झाला आहे. या व्हिडीओ पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत

बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) आणि अनन्या पांडे (Ananya Panday) या दोघीही फिल्मफेअर अवॉर्ड सोहळ्यात एकत्र आल्या होत्या. यावेळी एक व्हिडिओ सोशल मीडियावर खूप व्हायरल होत आहे. यामध्ये आलियाने अनन्या पांडेकडे साफ दुर्लक्ष केल्याचं दिसतंय. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर नेटकऱ्यांनी प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली.

नेमकं काय घडलं? 

नुकत्याच झालेल्या फिल्मफेअर ओटीटी पुरस्कार सोहळ्यामध्ये आलिया भट आणि अनन्या पांडे सहभागी झाल्या होत्या. व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये आलिया भट ब्लॅक ड्रेसमध्ये खूप सुंदर दिसत आहे. ती इव्हेंटला येताच तिचं लक्ष अभिनेता विकी कौशलकडे जातं. ती विकीला भेटते आणि त्याला मिठी मारते. विकीच्याच बाजूला अनन्या पांडे बसलेली असते. अनन्या आलियाची नजर आपल्याकडे जावी म्हणून डोळ्यांनी इशारा करते पण आलिया मात्र दुर्लक्ष करते.

पुढे आलिया खुर्चीवर बसते. त्यावेळीही अनन्या तिला भेटायचा प्रयत्न करते. मात्र अनन्याकडे न बघता आलिया मागे असलेल्या तिच्या मित्रांना भेटते. त्यामुळे अनन्याही नंतर आलियाशी न बोलता विकीशी बोलायला लागते. अनन्याचा चेहऱ्यावरची नाराजी यामुळे स्पष्टपणे नजरेस येते. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. अनेकांनी आलियाने गडबडीत अनन्याकडे बघितलं नाही, असं सांगून आलिया भटची बाजू घेतली. आलिया लवकरच 'लव्ह अँड वॉर' सिनेमात झळकणार आहे. तर अनन्या 'तू मेरा में तेरी, में तेरा तू मेरी' या सिनेमात झळकणार आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Alia Bhatt seemingly ignores Ananya Panday at Filmfare Awards.

Web Summary : At Filmfare, Alia Bhatt seemingly ignored Ananya Panday, greeting Vicky Kaushal instead. Despite Ananya's attempts to connect, Alia socialized with others, leaving Ananya visibly displeased. The video went viral, sparking mixed reactions.
टॅग्स :आलिया भटअनन्या पांडेटेलिव्हिजनबॉलिवूडफिल्मफेअर अवॉर्ड