Join us
Daily Top 2Weekly Top 5

...अन् जान्हवी कपूरबरोबर 'झिंगाट' गाण्यावर थिरकली रिहाना! अनंत अंबानी-राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यातील व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 2, 2024 13:07 IST

Anant-Radhika Pre Wedding : 'झिंगाट' गाण्यावर रिहानाचा जबरदस्त डान्स, जान्हवी कपूरने शेअर केला व्हिडिओ

सध्या जिकडेतिकडे अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्याची चर्चा रंगली आहे. प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानीच्या लग्नाची जोरदार तयारी सुरू आहे. गुजरातमधील जामनगर येथे त्यांचा प्री वेडिंग सोहळा पार पडत आहे. या सोहळ्याला सिनेजगताबरोबरच, क्रिकेट आणि उद्योगविश्वातील दिग्गज सेलिब्रिटींना आमंत्रित करण्यात आलं होतं. हॉलिवूडची पॉप सिंगर रिहानाने अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या विवाहसोहळ्यात गाणं गाऊन चार चांद लावले. याचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. पण, याबरोबरच तिचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे. 

अंबानींच्या या सोहळ्यात रिहाना बॉलिवूड सेलिब्रिटींवरही भारी पडली आहे. जिकडेतिकडे फक्त रिहानाचीच चर्चा होताना दिसत आहे. आधी रिहानाच्या सामानाने सगळ्याचं लक्ष वेधून घेतलं होतं. अनंत अंबानीच्या प्री वेडिंगला रिहाना ट्रकभर सामान घेऊन आली होती. त्यानंतर तिच्या परफॉर्मन्सने सगळे थक्क झाले होते. रिहानाने भारतातील चाहत्यांबरोबर केलेल्या कृतीसाठी तिच्यावर कौतुकाचा वर्षावही झाला. आता रिहानाचा अनंत अंबानी आणि राधिकाच्या प्री वेडिंग सोहळ्यातील डान्स करतानाचा व्हिडिओ पाहून चाहते अवाक् झाले आहेत. अनंत-राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये रिहाना झिंगाट गाण्यावर थिरकताना दिसली. 

जान्हवी कपूरने हा व्हिडिओ तिच्या इन्स्टाग्रामवरुन शेअर केला आहे. या व्हिडिओत जान्हवी आणि रिहाना लोकप्रिय झिंगाट गाण्यावर डान्स करताना दिसत आहेत. रिहानाचे डान्स मुव्ह्स पाहून नेटकरी थक्क झाले आहेत. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

दरम्यान, अनंत अंबानी-राधिका मर्चंटच्या प्री वेडिंग सोहळ्यात गाण्यासाठी रिहानाने तब्बल ४१ कोटी मानधन घेतल्याची माहिती आहे. त्यांचं हे प्री वेडिंग फंक्शन १ ते ३ मार्च दरम्यान पार पडणार आहे. त्यानंतर जुलै महिन्यात ते विवाहबंधनात अडकणार आहेत. 

टॅग्स :रिहानामुकेश अंबानीनीता अंबानीजान्हवी कपूर