Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मुरांबा' फेम अभिनेत्रीलाही होतं अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण, शेअर केले फोटो

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2024 16:15 IST

अनंत-राधिकाच्या लग्नाला हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. मुरांबा फेम अभिनेत्रीलाही अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण आलं होतं. 

Anant Ambani-Radhika Merchant Wedding : गेले काही दिवस जिकडेतिकडे फक्त एका लग्नाची चर्चा होताना दिसत आहे. भारतातील प्रसिद्ध उद्योगपती मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा धाकटा लेक अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांचा शाही विवाहसोहळा १२ जुलैला पार पडला. या ग्रँड वेडिंगचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. अनंत-राधिकाच्या लग्नाला हॉलिवूड आणि बॉलिवूड सेलिब्रिटींबरोबर मराठी सेलिब्रिटींनाही आमंत्रित करण्यात आलं होतं. मुरांबा फेम अभिनेत्रीलाही अनंत-राधिकाच्या लग्नाचं आमंत्रण आलं होतं. 

अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या लग्नाला अभिनेत्री काजल काटेने हजेरी झाली होती. काजलने अनंत-राधिकाच्या वेडिंग रिसेप्शनला हजेरी लावली होती. इन्टाग्राम स्टोरीमधून काजलने अनंत-राधिकाच्या लग्नातील व्हिडिओ शेअर केला होता. या व्हिडिओत तिने वेडिंग रिसेप्शनची झलक दाखवली होती. या रिसेप्शन सोहळ्यासाठी काजलने खास ग्लॅमरस लूक केला होता. डिझायनर लेहेंगा परिधान करत तिने खड्यांची ज्वेलरी घातली होती. बॉलिवूड अभिनेत्रीच्या सौंदर्याला टक्कर देणारा लूक काजलने केला होता. काजल माझी तुझी रेशीमगाठ मालिकेतून घराघरात पोहोचली. तिने मुरांबा मालिकेतही काम केलं आहे. 

दरम्यान, अनंत अंबानी आणि राधिका मर्चंटच्या शाही विवाहसोहळ्याने सगळ्यांचंच लक्ष वेधून घेतलं. बॉलिवूडसह या वेडिंग सोहळ्याला हॉलिवूड सेलिब्रिटींनीही हजेरी लावली होती. लग्नानंतर अनंत-राधिकाचं वेडिंग रिसेप्शन आणि आशीर्वाद सेरेमनीही ठेवण्यात आली होती. काजल काटेबरोबर या सोहळ्याला अमृता खानविलकर आणि गिरिजा ओक यांनीही हजेरी लावली होती. 

टॅग्स :अनंत अंबानीटिव्ही कलाकारमुकेश अंबानीसेलिब्रेटी वेडिंग