Join us

आनंदी तुमची खरंच बायको आहे? राघवच्या रिअल लाइफ चिंगीच्या प्रश्नामुळे अभिनेता झाला होता शॉक

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 13, 2023 16:37 IST

kashyap parulekar: 'या' कारमामुळे कश्यप कधीही त्याच्या लेकीला मालिका पाहू देत नाही.

छोट्या पडद्यावर गाजत असलेली मालिका म्हणजे 'नवा गडी नवं राज्य'. ही मालिका सध्या रंजक वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे या मालिकेविषयी प्रत्येक अपडेट घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. ही मालिका सुरु झाल्यापासून त्यातील कलाकार प्रेक्षकांमध्ये लोकप्रिय झाले आहेत. त्यामुळे पल्लवी पाटील (pallavi patil), अनिता दाते (anita date) आणि कश्यप परुळेकर (kashyap parulekar) या मुख्य भूमिका साकारणारे कलाकार प्रेक्षकांना त्यांच्यातीलच एक वाटतात. सध्या मालिकेतील कश्यप म्हणजेच राघव चर्चेत येत आहे. कश्यप त्याच्या मुलीला नवा गडी नवं राज्य ही मालिका दाखवत नाही. एका मुलाखतीत त्याने याविषयी भाष्य केलं.

अलिकडेच कश्यपने एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये त्याने तो कधीही मुलीला त्याची मालिका पाहू देत नसल्याचं सांगितलं. खरं तर नवा गडी नवं राज्य या मालिकेला प्रेक्षकांकडून भरभरुन प्रेम मिळत आहे. प्रेक्षक ही मालिका आवडीने पाहतात. मात्र, असं असतानाही त्याने त्याने त्याच्या लेकीला ही मालिका पाहण्यापासून विरोध केला आहे.

"माझी मुलगी मालिका पाहतांना त्यात खूप गुंतून जाते. त्यामुळे आम्ही तिला कधीच मालिका पाहू देत नाही. मध्यंतरी एका भागात राघव आनंदीवर चिडतो, तिला ओरडतो हे तिने पाहिलं आणि तिला खूप वाईट वाटलं. तू आनंदीसोबत असं नको वागूस असं तिने मला सांगितलं. ती फार भावनिक होऊन मालिका पाहते", असं कश्यप म्हणाला.

पुढे तो म्हणतो, "ती फक्त सहा वर्षांची आहे. एकदा ती माझ्या जवळ आली आणि मला म्हणते, आनंदी तुमची बायको आहे का? मी म्हटलं आनंदी माझी बायको नाही. तुझी आई माझी बायको आहे. त्यावर नाही. ती आई आहे आणि आनंदीच तुमची बायको आहे असं म्हणू लागली. यावर तिला खूप समजावलं. आम्ही खोट खोटं सगळं करत असतो. आम्ही नाटक खेळतो हे तिला समजावून सांगावं लागलं. पण, या गोष्टीवरुन माझ्या एक लक्षात आलं की ती फार रिलेट करते. त्यामुळे जर पुढे हे असंच झालं तर मोठी गडबड होईल. त्यामुळे तिच्यासमोर मालिका पाहू नका हे मी घरातल्यांना सांगितलं."

दरम्यान, नवा गडी नवं राज्य मालिकेत राघवची भूमिका साकारणारा अभिनेता कश्यप परुळेकर मोठ्या ब्रेकनंतर छोट्या पडद्यावर परतला आहे. यापूर्वी त्याने 'ठिपक्यांची रांगोळी' ,'मन उधाण वाऱ्याचे' या मालिकांमध्ये काम केलं आहे. 

टॅग्स :सेलिब्रिटीअनिता दातेपल्लवी पाटीलटेलिव्हिजन