Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेकाच्या मृत्यूचा बदला घेणारा बाप, मनोज वाजपेयींंच्या भैय्याजी सिनेमाचा रोमांचक टिझर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2024 15:50 IST

मनोज वाजपेयींचा १०० वा सिनेमा असलेल्या भैय्याजी सिनेमाचा टिझर भेटीला आलाय. अंगावर काटा आणणारा हा टिझर तुम्हीही बघा

मनोज वाजपेयींच्या आगामी 'भैय्याजी' सिनेमाची उत्सुकता शिगेला आहे. विशेष म्हणजे वाजपेयींचा हा १०० वा सिनेमा आहे. या सिनेमाचं गाणं 'बाघ का करेजा' काही दिवसांपुर्वी रिलीज झालं. आणि नुकतंच सिनेमाचा टिझर भेटीला आलाय.  'भैय्याजी' सिनेमाच्या टिझरमध्ये मृत पावलेल्या मुलाच्या हत्येचा सूड घेणारा बाप दिसून येतोय. आणि ही भूमिका साकारलीय मनोज वाजपेयी यांनी..

'भैय्याजी' च्या टिझरमध्ये बघायला मिळतं की, मनोज वाजपेयींचा मुलाचा अपघात होतो. मनोज रुग्णालयात मुलाच्या पार्थिवाची राख गोळा करतो. पुढे प्रोमोत पाहायला मिळतं की मुलाच्या मृत्यूची वेदना आणि असलेल्या रागात मनोज दुश्मनांचा बदला घेतो. टिझरमध्ये कथा स्पष्ट होत नाहीय तरीही  'भैय्याजी' सिनेमात अॅक्शन आणि इमोशन्स पुरेपूर दिसून येत आहेत.

'सिर्फ एक बंदा काफी है' या गाजलेल्या सिनेमाची टीम  'भैय्याजी' च्या माध्यमातून पुन्हा परतली आहे. मनोज बाजपेयी 'भैय्याजी'च्या भूमिकेत असलेला हा चित्रपट 24 मे 2024 रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. विनोद भानुशाली, समिक्षा शैल ओसवाल आणि शबाना रझा बाजपेयी उपस्थित, भैय्या जी, भानुशाली स्टुडिओ लिमिटेड, SSO प्रॉडक्शन आणि औरेगा स्टुडिओज प्रोडक्शन यांनी सिनेमाची निर्मिती केलीय. 

टॅग्स :मनोज वाजपेयीबॉलिवूड