Join us

अमृता सुभाषची झाली फसवणूक? ठळक अक्षरात लिहिलं CHEATED; "ह्याबद्दल बोलूच पण..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 12, 2025 10:58 IST

अमृता सुभाषच्या पोस्टवर सोनाली कुलकर्णीचीही कमेंट

मराठी अभिनेत्री अमृता सुभाष (Amruta Subhash) सध्या 'जारण' सिनेमामुळे चर्चेत आहे.  या सिनेमाची सध्या प्रचंड क्रेझ आहे. अनिता दातेचं काम पाहुन तर प्रेक्षकांचा थरकाप उडाला आहे. तर अमृतानेही सुंदर काम केलं आहे. सिनेमाची कोटींमध्ये कमाईही झाली आहे. एकीकडे इतकं कौतुक होत असताना आता अमृताने भलतीच पोस्ट केली आहे. तिच्या त्या पोस्टमुळे सर्वांनी काळजी व्यक्त केली आहे. 

अमता सुभाषने इन्स्टाग्रामवर 'cheated'(फसवणूक) असं ठळक अक्षरात लिहिलं आहे. यासोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, "ह्याबद्दल बोलूच पण आत्ता पूर्ण लक्ष माझ्या दोन नाटकांवर...'असेन मी नसेन मी' आणि'पुनश्च हनिमून'".

अमृताच्या अशा पोस्टने चाहत्यांनी काळजी व्यक्त केली आहे. तिला नक्की काय झालंय की हा कोणता पब्लिसिटी स्टंट आहे या संभ्रमात चाहते पडले आहेत. 'काय झालं अचानक', 'सगळं ठीक आहे ना?'. तसंच सोनाली कुलकर्णीनेही कमेंट करत लिहिले,'काय झालं? तू बरीयेस अशी आशा'.

अमृता सुभाषला नक्की काय झालं असाच प्रश्न सर्वांना पडला आहे. तिने ही पोस्ट सोशल मीडियावर पिनही करुन ठेवली आहे. त्यामुळे हा पब्लिसिटी स्टंटही असू शकतो असा अनेकांचा अंदाज आहे. अमृता सुभाष नुकतीच मराठी फिल्मफेअर अवॉर्ड्समध्ये सहभागी झाली होती. इथे ती एकदम आनंदी दिसत होती. मात्र आता दुसऱ्याच दिवशी तिची अशी पोस्ट संभ्रमात टाकणारी आहे.

टॅग्स :अमृता सुभाषमराठी अभिनेतासोशल मीडिया