Join us
Daily Top 2Weekly Top 5

"आमटी भात ते...", अमेरिकेतून भारतात परतलेल्या अमृता देशमुखने सांगितला अनुभव, म्हणाली, "अशी पण काही लोकं आहेत.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 13, 2023 12:18 IST

मेरिकेतील नाटकाचा दौरा संपवून आता अमृता देशमुख भारतात आली आहे. भारतात आलेल्या तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

बिग बॉस फेम अमृता देशमुख  ‘नियम व अटी लागू’ या नाटकाच्या प्रयोगासाठी अमेरिका दौऱ्यावर गेली होती.अमेरिकेतील नाटकाचा दौरा संपवून आता अमृता भारतात आली आहे. भारतात आलेल्या तिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केली आहे, ज्याने नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.

तब्बल दीड महिने अमेरिकेत नाटकाचे प्रयोग यशस्वी झाल्यानंतर मुंबईत परतली आहे. अमेरिकेत असताना अमृता अनेक चाहत्यांना भेटली आणि तिथल्या लोकांच्या घरी जाऊन पदार्थांचा आस्वाद देखील तिने घेतला. याभेटीदरम्यानच्या कोलाज एका व्हिडीओतून शेअर केला आहे.    हा व्हिडीओ शेअर करताना ती म्हणाली, ''माझे नातेवाईक आत्ता-आत्ता कुठे माझ्या लक्षात रहायला लागले होते आणि अचानक इतक्या फॅमिलीची माझ्या आयुष्यात एन्ट्री झाली. जे माझे होस्ट होते अमेरिकेमध्ये आमटी भात ते मेक्सिकन सगळं ह्या लोकांनी प्रेमाने दिलं..काहींनी खास सुट्ट्या काढून भूर नेलं..! अशी पण काही लोकं आहेत जी ह्या photos मध्ये नाहीएत पण त्यांच्या प्रेमामुळे ते माझ्या मनात राहतील. आता ही सगळीच मंडळी instagram वर नाहीत..पण तरी मनात घर करून गेलीयेत.''

प्रसाद जावडे-अमृता देशमुख हे सध्या चाहत्यांचं लाडकं कपल आहे. त्यांनी आपल्या क्युटनेसने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. साखरपुड्याचे सुंदर फोटो, सोशल मीडियावरील त्यांचे क्युट व्हिडिओ सगळंच खूप गोड आहे.  लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. अमृता आणि प्रसाद ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. तिथेच त्यांच्यातील प्रेमाचं नातं बहरलं.

दरम्यान, अमृताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘फ्रेशर्स’, ‘मी तुझीच रे’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटात अमृताने मुख्य भूमिका साकारली होती. याबरोबर अमृता रेडिओ जॉकीदेखील आहे. पुण्याची टॉकरवडी अशी तिची ओळख आहे. 

टॅग्स :अमृता देशमुख