मराठी कलाविश्वातील लोकप्रिय जोडी म्हणजे प्रसाद जवादे (Prasad Jawade) आणि अमृता देशमुख (Amruta Deshmukh). ही जोडी सातत्याने चर्चेत येत असते. आज अमृताचा वाढदिवस (Amruta deshmukh Birthday) आहे. अमृतावर आज चाहते आणि मित्रमैत्रिणींकडून शुभेच्छांचा वर्षाव होतोय. प्रसादनेही आपल्याला लाडक्या बायकोसाठी खास पोस्ट शेअर केली आहे.
प्रसादने त्याच्या इन्स्टाग्रामवर अमृतासोबतचा एक फोटो पोस्ट केलाय. यावेळी त्याच्या हटके कॅप्शनं लक्ष वेधलं. त्यानं लिहलं, "माझी बेबी, मला तू खूप आवडतेस.तुझं मला उठवणं... तुझ्यासाठी कॉफी बनवणं...कामावर जाण्याआधी गुड बाय किस देणं, तुला फोन करणं, कामावरुन येताच परत घरी तुला भेटणं, ते एक फूल आणणं, एकत्र जेवण करणं, तुझ्या मीठीत लहानबाळासारखं झोपणं. मुळात प्रत्येक गोष्ट तुझ्याभोवतीच आहे. फक्त तू आणि तू. माझ्या प्रिय मैत्रीण, प्रियसी आणि पत्नीसाठीचं माझं आयुष्य आहे. ३१ जानेवारी हा माझ्या आयुष्यातील सर्वात मौल्यवान दिवस! माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे, अमृता देशमुख तुला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा", या शब्दात त्यानं आपलं प्रेम व्यक्त केलं आहे.
'बिग बॉस मराठी'च्या चौथ्या पर्वात सहभागी झालेली ही जोडी या शो दरम्यानच एकमेकांच्या प्रेमात पडले आणि त्यांनी लग्नगाठ बांधली.प्रसाद आणि अमृता सोशल मीडियावर कमालीचे सक्रीय आहेत. त्यामुळे ते कायम एकमेकांसोबतचे फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. अमृता तिच्या नाटकांच्या माध्यमातून कायम प्रेक्षकांच्या भेटीला येत असते.तर, प्रसाद सध्या पारु या मालिकेत महत्त्वपूर्ण भूमिका साकारत आहे.