सध्या अभिषेक बच्चनची प्रमुख भूमिका असलेला I want to talk सिनेमा चांगलाच चर्चेत आहे. गंभीर विषयावरील या सिनेमाची कहाणी डोळ्यात पाणी आणणारी आहे. 'पिकू', 'सरदार उधम', 'ऑक्टोबर' असे संवेदनशील सिनेमे बनवणाऱ्या शूजित सरकार यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलंय. अभिषेक बच्चनचा हा सिनेमा माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर प्रेक्षकांंचं चांगलं प्रेम मिळवतोय. अशातच अभिषेकचा हा सिनेमा त्याचे वडील अन् भारतीय चित्रपटसृष्टीतील महानायक अमिताभ बच्चन यांना कसा वाटला? जाणून घ्या
अमिताभ यांना कसा वाटला अभिषेकचा I want to talk?
अलीकडेच अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ब्लॉगवर अभिषेकच्या I want to talk सिनेमाचं खूप कौतुक केलंय. अमिताभ यांनी पोस्ट लिहून म्हटलंय की, "अभिषेकचा हा सिनेमा प्रेक्षकांच्या मनाच्या तळाशी जाऊन त्यांना सिनेमाशी जोडून घेतो. त्यामुळे आपणही या कथेचा हिस्सा आहोत, असं प्रेक्षकांना वाटतं. अभिषेकने अर्जुन सेनची व्यक्तिरेखा पूर्णपणे जगलीय. याशिवाय अभिनयामध्ये अभिषेकने चांगलीच छाप पाडलीय."
अमिताभ यांनी ट्रोल करणाऱ्या लोकांना हरिवंशराय बच्चन यांच्या एका कवितेतून उत्तर दिलं. त्यांनी लिहिलं की, "लोक त्यांच्या गरजेनुसार इतरांना चांगलं किंवा वाईट ठरवत असतात. अमिताभचं व्यक्तिमत्व कसं आहे हे गृहित न धरता लोकांचे विचार आणि गरज यावर हे सर्व अवलंबून असतं." सध्या अभिषेक बच्चनचा I want to talk सिनेमा थिएटरमध्ये चांगला गाजत असून अभिषेकच्या अभिनयाचं चांगलंच कौतुक होतंय.