Join us
Daily Top 2Weekly Top 5

'त्या' एका चुकीमुळे बिग बी अमिताभ बच्चन यांनी मागितली माफी

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 16, 2023 13:40 IST

अमिताभ बच्चन यांनी एक मोठी चूक केली आहे, ज्यासाठी त्यांनी चाहत्यांची माफी देखील मागितली.

हिंदी सिनेसृष्टीचा डॉन अर्थात अमिताभ बच्चन सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. अमिताभ बच्चन सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या चाहत्यांशी जोडलेले असतात. पण आता अमिताभ बच्चन यांनी एक मोठी चूक केली आहे, ज्यासाठी त्यांनी चाहत्यांची माफी देखील मागितली आहे. वाढदिवशी चाहत्यांनी केलेल्या शुभेच्छांना परत उत्तर देऊ न शकल्याने अमिताभ यांनी ट्विट करत माफी मागितली. 

अमिताभ बच्चन यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली. त्यात त्यांनी लिहलं की, अनेकांनी मला माझ्या वाढदिवसानिमित्त एसएमएसद्वारे शुभेच्छा पाठवल्या. पण मी त्यांचे आभार मानू शकलो नाही. त्यांच्या शुभेच्छाच्या मेसेजवर माझा रिप्लाय न गेल्याने त्यांना आश्चर्य वाटलं असेल. पण, पण, ही माझी एक सवय आहे, जी अनेकांना माहिती नाही. याबद्दल मी माफी मागतो. माझ्या मोबाईलवर बर्‍याच वर्षांपासून तक्रार करूनही सिग्नल नीट येत नाही. म्हणून ज्यांना माझे उत्तर मिळाले नाही. त्यांची मी माफी मागतो. तुमचा प्रेमाने भरलेला आशिर्वाद हे माझे भाग्य आहे'.

हिंदी सिनेसृष्टीचा डॉन अर्थात अमिताभ बच्चन यांनी (११ ऑक्टोंबर २०२३ ) रोजी आपला 81 वा वाढदिवस साजरा केला. अमिताभ बच्चन यांच्या 'जलसा' या बंगल्याच्या बाहेर हजारोच्या संख्येने चाहते उपस्थित राहून अभिताभ बच्चन यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होते. अमिताभ बच्चन यांनी आपल्या अभिनयाने गेली अनेक वर्षे चाहत्यांच्या मनावर राज्य केलं आहे. 

अमिताभ बच्चन यांच्या आगामी चित्रत्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत आहेत. त्यांचे प्रोजेक्ट के आणि गणपत हे चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. गणपत या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वी रिलीज झाला आहे. गणपत हा चित्रपट 20 ऑक्टोबर 2023 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. 

टॅग्स :अमिताभ बच्चनबॉलिवूडसेलिब्रिटी