Join us
Daily Top 2Weekly Top 5

४५ वर्षाआधी रेखाच्या या गोष्टीवर चिडत होते अमिताभ बच्चन, नंतर बनला किस्सा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2021 14:01 IST

Amitabh Bachchan - Rekha : रेखा आणि अमिताभ यांनी भलेही अनेक वर्षांपासून एकत्र काम केलं नसेल, पण त्यांचं नाव काहीना काही कारणाने जोडलं जातंच.

अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रेखा (Rekha) ने पहिल्यांदा 'दोन अनजाने' (Do Anjane) सिनेमात काम केलं होतं. तेव्हा त्यांनाही माहीत नव्हतं की, त्यांची ही भेट जीवनभर त्यांची साथ सोडणार नाहीये. २६ नोव्हेंबर १९७६ ला रिलीज झालेल्या या सिनेमावेळी खरंच अमिताभ आणि रेखा अनोळखी होते. पण शूटींगवेळी दोघांमध्ये अशी काही केमिस्ट्री जमली, प्रेक्षकांना ही जोडी आवडू लागली होती.

अमिताभला भेटून काय वाटलं रेखाला

रेखा आणि अमिताभ यांनी भलेही अनेक वर्षांपासून एकत्र काम केलं नसेल, पण त्यांचं नाव काहीना काही कारणाने जोडलं जातंच. असं म्हणतात की, त्यांचं नातं असंच आहे. ते डोळ्यातूनच एकमेकांच हाल जाणून घेत होते. पहिल्या सिनेमावेळी दोघेही सहज नव्हते. रेखाने सिमी ग्रेवालच्या  शोमध्ये सांगितलं होतं की, दो अनजाने सिनेमाच्या शूटींगवेळी मी सीनिअर होते. पण 'दीवार'च्या यशामुळे अमिताभ बच्चन हे नाव इंडस्ट्रीत गाजलं होतं. त्यांच्या यशाचा प्रभाव होता की, सेटवर अमिताभ यांना बघून मी इतकी नर्वस होते की, माझे डायलॉग विसरत होती'. अमिताभ यांच्या पर्सनॅलिटीने रेखा फार प्रभावित होती. ती म्हणाली होती की, 'मी अमिताभसारख्या व्यक्तीला कधीच भेटले नाही. त्याच्या  अनेक गुण आहेत.  अमिताभ भेटल्यावर माझी विचार करण्याची पद्धतच बदलली होती'.

रेखाच्या या गोष्टीवर चिडायचे अमिताभ बच्चन

लेखक-पत्रकार यासिर उस्मानचं पुस्तक रेखा - द अनटोल्ड स्टोरी मध्ये लिहिलं आहे की, दो अनजाने च्या सेटवर रेखा वेळेवर येत नव्हती. यावरून अमिताभ फार चिडत होते. एक दिवस अमिताभ तिला म्हणाले की, सेटवर वेळेवर येत जा आणि आपल्या शूटींगला सीरिअसली घ्या. अमिताभने हे अशा अंदाजात सांगितलं की, रेखा नंतर वेळेवर सेटवर येत होती. कामाबाबत अमिताभचं पॅशन रेखाला खूप आवडायचं. नंतर दोघांची चांगली मैत्री झाली. 

टॅग्स :अमिताभ बच्चनरेखाबॉलिवूड