ठळक मुद्देअमिताभ बच्चन यांचे सिनेमातला पहिला लूक आऊट झाला आहेअमिताभ बच्चन यात वकिलाची भूमिका साकारणार आहेत
अमिताभ बच्चनतापसी पन्नूच्या बदला सिनेमाची सध्या जोरदार चर्चा आहे. काही दिवसांपूर्वीच सिनेमाचा ट्रेलर आऊट झाला आहे. या ट्रेलर प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे. ट्रेलरनंतर अमिताभ बच्चन यांचे सिनेमातला पहिला लूक आऊट झाला आहे. अमिताभ बच्चन आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन हा फोटो शेअर केला आहे. या फोटोला त्यांनी कॅप्शन सुद्धा दिले आहे.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}}अमिताभ बच्चन यात वकिलाची भूमिका साकारणार आहेत. ‘बदला’ या सिनेमात अमिताभ बादल गुप्ता नामक पात्र साकारताना दिसणार आहेत. बादल गुप्ता ४० वर्षांत एकही केस हरलेला नाही. पण एक केस त्याला आव्हान देते. ही केस तापसी पन्नू लढताना दिसतेय. एकंदर काय तर या चित्रपटाच्या निमित्ताने एक जबरदस्त कोर्टरूम ड्रामा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित या सिनेमात शाहरुख महत्त्वाच्या भूमिकेमध्ये दिसणार आहे. सुजॉय घोष सस्पेंस थ्रीलर सिनेमासाठी ओळखले जातात. या चित्रपटाची निर्मिती सुनीर खेत्रपाल करणार आहे. हा एक मर्डर मिस्ट्री चित्रपट असणार आहे. तापसी पन्नूदेखील यात मुख्य भूमिका साकारते आहे. बदलाची पटकथा लिहिण्यास दहा वर्षांचा काळ लागला असं समजतंय. बदला हा स्पेनिश सिनेमा 'द इनविसेबल गेस्ट'चा हिंदी रिमेक आहे.
शाहरुख खान आणि अमिताभ बच्चन यांनी याआधी 'भूतनाथ', 'मोहब्बतें', 'वीर-जारा', 'कभी खुशी कभी गम' आणि 'कभी अलविदा न कहना' सारख्या सिनेमात एकत्र काम केले आहे. बदला सिनेमामध्ये ते पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहे. येत्या ८ मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.