Join us
Daily Top 2Weekly Top 5

सुशांतचा 'काई पो छे' को-स्टार अमित सधने ४ वेळा केला होता आत्महत्येचा प्रयत्न...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 21, 2020 12:38 IST

अमित सधने नुकतंच सांगितलं की, जेव्हा तो १६-१८ वर्षांचा होता तेव्हा त्याने ४ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता.

सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर इंडस्ट्रीची डार्क साइड आणि मेंटल हेल्थवर बरीच चर्चा होत आहे. यादरम्यान मनोरंजन इंडस्ट्रीशी संबंधित अनेक लोकांच्या सुसाइडच्या बातम्या समोर आल्या आहेत. अनेकांनी त्यांच्या डिप्रेशनबाबत सांगितलं आहे. यातीलच एक आहे सुशांतचा 'काई पो छे' मधील को-स्टार अमित सध.

अमित सधने नुकतंच सांगितलं की, जेव्हा तो १६-१८ वर्षांचा होता तेव्हा त्याने ४ वेळा आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला होता. त्याने सांगितले की, तो सूसायडल नव्हा. पण तरीही तो त्याचं जीवन संपवण्याचा प्रयत्न करत राहत होता. चौथ्या प्रयत्नानंतर त्याने निर्णय घेतला की, आता तो असं करणार नाही. आता पुढे जायचं आहे. यानंतर त्याने 'नेव्हर गिव्ह अप'चा मंत्र स्वीकारला आणि कधीही मागे वळून पाहिलं नाही.

त्याने सांगितलं की, त्याच्या मनात सकारात्मकता आणि ताकद इतक्या लवकर आली नाही. MensXP सोबत बोलताना तो म्हणाला की, त्याला यातून बाहेर पडण्यासाठी २० वर्षे लागली. तो म्हणाला की, मी यातून एका दिवसात बाहेर पडलो नाही. यासाठी मला २० वर्षे लागली. मला केवळ हे माहीत होतं की, हा अंत नाही.

त्याने सांगितले की, ज्या दिवशी त्याला लक्षात आलं की, मिळालेलं जीवन हे गिफ्ट आहे. त्याच दिवसापासून त्याचा दृष्टीकोन सकारात्मक झाला. तो म्हणाला की, आता माझ्या मनात लोकांसाठी दया आणि प्रेम आहे. अनेक लोक सुसाइड करतात आणि अनेक लोकांना काही वाईट वेळी याचा विचार येतो. माझ्यासाठी खरी ताकद यातून बाहेर येणं आहे. 

टॅग्स :अमित संधसुशांत सिंग रजपूतबॉलिवूड