बॉलिवूड अभिनेता सनी देओल (Sunny Deol) आणि अमीषा पटेलचा (Ameesha Patel) 'गदर- एक प्रेमकथा' हा सिनेमा 2001 साली प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. त्याच्या 22 वर्षांनंतर 'गदर' चा सिक्वल सिनेमागृहात प्रदर्शित करण्यात आला. या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली. 22 वर्षांनंतरही सनी देओलची तीच क्रेझ पाहायला मिळाली. आता चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची चर्चा सुरू झाली आहे. याबद्दल अभिनेत्री अमिषा पटेल हिनं अपडेट दिलं आहे.
'गदर- एक प्रेमकथा' आणि 'गदर 2' मध्ये अमिषा पटेलने सकीनाची भूमिका साकारली आहे. तिच्या पात्राला प्रेक्षकांचं भरपूर प्रेम मिळालं. आता नुकतंच अभिनेत्री रविवारी चित्तौडगड येथे पोहोचली होती. यावेळी चाहत्यांना तिनं नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या. अमिषानं शहरातील मिष्टान्न प्रतिष्ठानच्या उद्घाटन समारंभाला उपस्थिती लावली होती.
यावेळी जेव्हा अमिषा पटेलला 'गदर 3' (Gadar 3) मध्ये दिसणार आहे का असे विचारण्यात आले, तेव्हा ती हसत म्हणाली, "अगदी!' तारा आणि सकिनाशिवाय गदर अपूर्ण आहे". तिच्या या विधानामुळे चाहत्यांची उत्कंठा वाढली आहे. हा एक पीरियड अॅक्शन ड्रामा असणार आहे. तिसऱ्या भागाच्या कथानकाबद्दल लेखक सध्या काम करत आहेत".' गदर 3'मध्येही सेम कास्ट असणार आहे.