Join us
Daily Top 2Weekly Top 5

माधुरी दीक्षित-विद्या बालनच्या नृत्याचा नजराणा! 'भूल भूलैय्या ३'मधील 'आमी जे तोमार' गाण्याची झलक

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2024 17:28 IST

'भूल भूलैय्या ३'मधील बहुप्रतिक्षित आमी जे तोमार गाण्याची झलक भेटीला आलीय. या तारखेला हे पूर्ण गाणं पाहायला मिळणार (bhool bhulaiyya 3)

सध्या बॉलिवूडमध्ये आगामी 'भूल भूलैय्या ३'ची उत्सुकता शिगेला आहे. कार्तिक आर्यन पुन्हा एकदा रुह बाबाच्या भूमिकेतून भुतांना बाटलीत बंद करायला सज्ज आहे. यावेळी मात्र कार्तिक आर्यनचा सामना 'भूल भूलैय्या' युनिव्हर्समधील सगळ्यात खतरनाक नायिका मंजुलिकाशी होणार आहे. 'भूल भूलैय्या'च्या पहिल्या भागातील 'आमी जे तोमार' हे गाणं आजही सर्वांच्या मनात घर करुन आहे. 'भूल भूलैय्या ३'मध्ये हेच गाणं वेगळ्या अंदाजात प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. विशेष म्हणजे माधुरी दीक्षित आणि विद्या बालन यांच्या डान्सची जुगलबंदी या गाण्यातून दिसणार आहे.

'भूल भूलैय्या ३'च्या आमी जे तोमार गाण्याची झलक

टी-सीरीजने 'भूल भूलैय्या ३'मधील 'आमी जे तोमार' गाण्याची झलक शेअर केलीय. या गाण्यात माधुरी आणि विद्याच्या डान्सची आणि सुंदर अदाकारीची झलक बघायला मिळते. याशिवाय श्रवणीय संगीत बॅकग्राऊंडला वाजताना दिसतं. हे संपूर्ण गाणं उद्या रिलीज करण्यात येणार आहे. सध्या या गाण्याचं ऑडिओ व्हर्जन रिलीज करण्यात आलंय. उद्या माधुरी दीक्षित आणि विद्या बालनच्या गाण्याचं व्हिडीओ व्हर्जन रिलीज करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्वांची उत्सुकता शिगेला आहे.

'भूल भूलैय्या ३' ची उत्सुकता शिगेला

'भूल भूलैय्या ३' दिवाळीच्या मुहुर्तावर १ नोव्हेंबर रोजी सर्वत्र प्रदर्शित होणार आहे. हा सिनेमा रोहित शेट्टीच्या 'सिंघम अगेन'शी भिडणार आहे. २००७ साली आलेल्या 'भूल भुलैय्या'चा हा तिसरा भाग आहे. पहिल्या भागात अक्षय कुमारने सर्वांचं मन जिंकलं होतं. तर दुसऱ्या भागात कार्तिक आर्यननेही कमाल केली होती. आता तिसऱ्या भागात विद्या बालनने कमबॅक केलं आहे तर माधुरी पहिल्यांदाच हॉरर भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

टॅग्स :माधुरी दिक्षितविद्या बालनभूल भुलैय्या