Join us

१८ वर्षांपूर्वीचा अमेय वाघसोबतचा फोटो हेमंत ढोमेने केला शेअर; नेटकरी म्हणतात- कोवळी पोरं आज...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2025 13:46 IST

हेमंत ढोमेने अमेय वाघसोबतचा फोटो शेअर करुन भावुक पोस्ट लिहिली आहे जी सोशल मीडियावर चर्चेत आहे (hemant dhome, amey wagh)

सध्या मराठी मनोरंजन विश्वात 'फसक्लास दाभाडे' सिनेमाची चांगलीच चर्चा आहे. या सिनेमात दिग्गज कलाकारांची फौज आहे. 'फसक्लास दाभाडे' सिनेमाच्या निमित्ताने अमेय वाघ आणि हेमंत ढोमे यांनी १८ वर्षांनंतर एकमेकांसोबत काम केलंय. हेमंत ढोमेने अमेयसोबतचा १८ वर्षांपूर्वीचा फोटो शेअर करुन लिहिलंय की, "कंट्रोल नसणारे… ते कंट्रोल असणारे दोघे! २००६ साली म्हणजे बरोबर १८ वर्षांपूर्वी आपण दोघांनी एकत्र काम केलं होतं लूज कंट्रोल या आपल्या नाटकात आणि त्यानंतर आज फसक्लास दाभाडे ला आपण पुन्हा एकत्र आलो चित्रपटात!"

"मधल्या काळात काय काय घडून गेलं… तुझा प्रचंड inspire करणारा प्रवास मी प्रेमाने आणि अभिमानाने बघत होतो… आपण जेव्हा जेव्हा एकत्र आलो तेव्हा वेगळं काहीतरी करण्याचा प्रयत्न केला… लोकांना आनंद देण्याचा प्रयत्न केला! आपण कंट्रोल लूज करून जे काही केलं ते फसक्लासंच केलं आणि लोकांना लक्षात राहिल असंच काम केलं! अमुडी आता मधला १८ वर्षांचा काळ भरून काढायचांय, खूप काम करायचंय!"

"तुझ्या कामातला अफाट प्रामाणिकपणा आणि माझी जिद्द या जोरावर आपण काहीतरी constructive घडवू एवढं नक्की! माझ्या प्रेमळ, येड्या आणि तितक्याच innocent सोनूला तू पडद्यावर साकारलंस आणि नुसतं साकारलं नाहीस तर ‘तोडलंस’ त्या बद्दल तुला घट्ट मिठी आणि खूप प्रेम! बाकी आता एकत्र रहायचं, मग सग्गळं होतंय आपोआप! तू Superstar आहेस आणि कायम राहणार! LOVE YOU!"

हेमंत ढोमेची पोस्ट आणि दोघांचा जुना फोटो पाहताच नेटकऱ्यांनी कमेंट करुन त्यांची पसंती दिली आहे. 'बरेच जुने मित्र दिसता', 'कोवळी पोरं ते प्रतिष्ठित कलाकार... What a Journey !!', 'खरंच तोडलंय अमेयने !!' अशा कमेंट्स करुन नेटिझन्सने अमेय-हेमंत यांच्या आजवरच्या प्रवासाला दाद दिली असून दोघांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. 

टॅग्स :Hemant Dhome Today Newsअमेय वाघमराठी चित्रपटमराठी अभिनेता