Join us
Daily Top 2Weekly Top 5

'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराजची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री, प्रोमो आला समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 26, 2024 12:14 IST

छोटा सिम्बा बनून साईराज करणार प्रेक्षकांचं मनोरंजन, 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'नंतर लोकप्रिय मालिकेत एन्ट्री

सोशल मीडियावर अनेक गाणी व्हायरल होत असतात. अशाच गाण्यांपैकी एक म्हणजे 'आमच्या पप्पांनी गणपती आणला'. या गाण्याला प्रचंड लोकप्रियता मिळाली. या गाण्यापेक्षाही त्यातील बालकलाकाराचं प्रचंड कौतुक झालं होतं. 'आमच्या पप्पांनी गणपती आणला' गाण्यात लडिवाळ बोलणारा आणि क्यूट हावभाव करणाऱ्या साईराज केंद्रेने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं होतं. या गाण्यामुळे साईराजला प्रसिद्धी मिळाली. आता साईराजची लोकप्रिय मालिकेत एन्ट्री झाली आहे. 

'आमच्या पप्पांनी गणपती आणला' फेम साईराज मालिकेतून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. झी मराठी वाहिनीवरील अतिशय लोकप्रिय अशा 'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत साईराजची एन्ट्री झाली आहे. या मालिकेचा प्रोमो नुकताच समोर आला आहे. या प्रोमोमध्ये साईराजची झलक पाहायला मिळणार आहे. साईराज या मालिकेत अप्पी आणि अर्जुन यांचा लेक अमोल ही भूमिका साकारताना दिसणार आहे. या मालिकेच्या प्रोमोमध्ये या छोटा सिम्बाचा डॅशिंग अंदाज पाहायला मिळत आहे. 

'अप्पी आमची कलेक्टर' मालिकेत ७ वर्षांचा लीप दाखविण्यात येणार आहे. या मालिकेच्या नव्या प्रोमोमध्ये अप्पी तिच्या मुलासोबत उत्तराखंडमध्ये कलेक्टर म्हणून गेल्याचं दिसत आहे. तिथेच अर्जुनदेखील येत असल्याचं प्रोमोमध्ये दिसत आहे. अप्पी तिच्या लेकासोबत मंदिरात पाया पडत असताना अमोल आणि अर्जुनची गाठभेट होते. आता मालिकेत पुढे काय होणार हे पाहण्यासाठी प्रेक्षकही उत्सुक आहेत. १ मेला महाराष्ट्र दिन विशेषनिमित्त मालिकेचा हा भाग प्रसारित केला जाणार आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारझी मराठी