Pushpa 2 Advance Booking : सुपरस्टार अर्जुन (Allu Arjun), रश्मिका मंदाना (Rashmika Mandanna) आणि फहद फासिल (Fahadh Faasil) स्टारर 'पुष्पा 2: द रुल' (Pushpa 2: The Rule) बॉक्स ऑफिसवर (Box Office) धुमाकूळ घालण्यासाठी सज्ज आहे. 'पुष्पा 2'च्या फर्स्ट डे फर्स्ट शोसाठी चाहते आतूर असून तिकीट खरेदीही (Jawan Movie Advance Booking) रेकॉर्ड ब्रेक सुरु आहे. 'पुष्पा 2' चित्रपट 5 डिसेंबरला प्रदर्शित होणार असून चित्रपटाची अॅडव्हान्स बुकींग सुरु आहे. 'पुष्पा 2' चित्रपटाने अॅडव्हान्स बुकींगमध्ये रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे.
'पुष्पा 2' सिनेमाचं अॅडव्हान्स बुकींग हे 30 नोव्हेंबर सुरू झालं होतं. या चित्रपटासाठी ज्या प्रचंड गतीने अॅडव्हान्स बुकिंग केले जात आहे ते पाहता, 'पुष्पा 2' हा देशांतर्गत आणि जागतिक बॉक्स ऑफिसवर सर्वात मोठा भारतीय ओपनर ठरण्याची शक्यता आहे. चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी अजून फक्त एक दिवस बाकी राहिला आहे. Saknilk च्या अहवालानुसार, रिलीजच्याआधीच आतापर्यंत 80 कोटींपेक्षा अधिक कमाई केली आहे.
‘पुष्पा’च्या २०२१ मध्ये प्रदर्शित झालेल्या पहिल्या भागाने बॉक्स ऑफिस कलेक्शनचे सर्व रेकॉर्ड्स मोडले होते. त्यामुळे आता या दुसऱ्या भागाकडून सुद्धा प्रेक्षकांना प्रचंड अपेक्षा आहेत. ‘Pushpa 2’ चित्रपटाची सध्या सर्वत्र क्रेझ निर्माण झाली आहे. तब्बल ३ वर्षांच्या प्रतीक्षेनंतर प्रेक्षकांना, आता पुन्हा एकदा सिनेमागृहांमध्ये ‘पुष्पाराज’ अनुभवता येणार आहे.