Join us

'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनची चाहत्यांना कळकळीची विनंती, म्हणाला- "कोणत्याही प्रकारे.."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2024 17:39 IST

अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर सर्व चाहत्यांना हात जोडून विनंती केलेली दिसतेय. अभिनेता नेमका काय म्हणालाय बघा (pushpa 2)

'पुष्पा २' सिनेमाने चांगलाच धुमाकूळ घातला. परंतु 'पुष्पा २'च्या यशस्वी कामगिरीला चांगलंच गालबोट लागलं. 'पुष्पा २'च्या प्रिमियरला संध्या थिएटरबाहेर झालेल्या चेंगराचेंगरीत एका महिलेचा मृत्यू झाला. याशिवाय त्या महिलेचा छोटा मुलगा सध्या हॉस्पिटलमध्ये जीवनाशी झुंज देत आहे. या घटनेमुळे अल्लू अर्जुनला काही दिवसांपूर्वी अटकही करण्यात आली होती. आता अल्लू अर्जुनने सोशल मीडियावर सर्व चाहत्यांना कळकळीची विनंती करुन आवाहन केलंय.

अल्लू अर्जुनचं चाहत्यांना आवाहन

अल्लू अर्जुनने नुकतीच सोशल मीडियावर पोस्ट करुन लिहिलंय की, "तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया जबाबदारीने मांडा अशी मी सर्व चाहत्यांना कळकळीची विनंती करतो. ऑनलाइन आणि ऑफलाइन कोणत्याही प्रकारची अपमानास्पद भाषा आणि वर्तवणूक करु नका. बनावट ID आणि प्रोफाइलद्वारे कोणी माझ्या चाहत्यांची दिशाभूल करत असेल, याशिवाय कोणी अपमानास्पद पोस्ट करत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. अशा पोस्टमध्ये स्वतःला गुंतवू नका अशी मी चाहत्यांना विनंती करतो."

पीडित कुटुंबाला मदत

मीडिया रिपोर्टनुसार, काही दिवसांपूर्वी ' पुष्पा २' चे दिग्दर्शक सुकुमार यांनी रुग्णालयात जाऊन जखमी मुलाच्या तब्येतीची विचारपूस केली. याशिवाय त्याच्या कुटुंबीयांसोबत संवाद साधला. त्याचबरोबर या पीडित कुटुंबासाठी मदतीचा हात त्यांनी पुढे केला आहे. त्यांनी या कुटुंबाला जवळपास ५ लाखांची आर्थिक मदत करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं आहे. सोशल मीडियावर सुकुमार यांच्या पीआरओ मार्फत पोस्ट शेअर करण्यात आली आहे

टॅग्स :पुष्पाअल्लू अर्जुनरश्मिका मंदाना