Join us
Daily Top 2Weekly Top 5

अल्लू अर्जुननं लग्नाच्या १५ व्या वाढदिवसानिमित्त पत्नीला गिफ्ट दिली महागडी कार; किंमत ऐकून थक्क व्हाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2026 14:26 IST

अर्जुनने आपल्या लाडक्या पत्नीला एक अत्यंत महागडी आणि आलिशान भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीतील 'आयकॉन स्टार' अल्लू अर्जुन (Allu Arjun) आणि त्याची पत्नी स्नेहा रेड्डी (Sneha Reddy) यांनी नुकताच त्यांच्या लग्नाचा १५ वा वाढदिवस मोठ्या उत्साहात साजरा केला. या खास प्रसंगी अल्लू अर्जुनने आपल्या लाडक्या पत्नीला एक अत्यंत महागडी आणि आलिशान भेट देऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

लग्नाच्या १५ व्या वाढदिवसानिमित्त अल्लू अर्जुनने स्नेहाला एक चमकदार काळी मर्सिडीज (Mercedes-Benz) कार भेट दिली आहे. सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये, अल्लू अर्जुन आपल्या घराच्या गॅरेजमध्ये स्नेहाला या आलिशान कारची चावी देताना दिसत आहे. यावेळी त्याचे वडील अल्लू अरविंद, मुलगा अयान आणि मुलगी अरहा हे देखील उपस्थित होते. ही भेट पाहून स्नेहा भावूक झाली आणि तिने प्रेमाने अल्लू अर्जुनच्या गालावर किस केले.  रिपोर्टनुसार, या लक्झरी कारची किंमत सुमारे १.८१ कोटी आहे.

"तुझ्याशिवाय हा प्रवास अपूर्ण..."केवळ महागडी भेटच नाही, तर अल्लू अर्जुनने स्नेहासाठी एक अतिशय भावनिक पोस्टही शेअर केली. त्याने लिहिले, "वाढदिवसाच्या शुभेच्छा, गोंडस. आपल्या एकत्र आलो, त्यास १५ वर्षे पूर्ण झाली आहेत. तुझ्याशिवाय हा प्रवास कधीच इतका अद्भुत झाला नसता". स्नेहाने देखील त्यांच्या लग्नातील काही जुने आणि सुंदर फोटो शेअर करत अल्लू अर्जुनचे आभार मानले. तिने लिहिले की, "या १५ वर्षांत आपण प्रेमाने भरलेलं एक जग निर्माण केलं आहे, जे माझ्यासाठी सर्वकाही आहे".

१५ वर्षांचा यशस्वी प्रवास

अल्लू अर्जुन आणि स्नेहा रेड्डी यांची लव्हस्टोरी एखाद्या फिल्मी कथेपेक्षा कमी नाही.  एका कॉमन फ्रेंडच्या लग्नात त्यांची पहिली भेट झाली, जिथे अल्लू अर्जुन स्नेहाच्या प्रेमात पडला. अल्लू अर्जुन हे नाव तिच्यासाठी नवीन नव्हतं. तो अभिनेता असल्याचं तिला माहिती होतं. पण त्याचे सिनेमे तिनं पाहिले नव्हते. त्यांच्या मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं. काही वर्षांच्या रिलेशनशिपनंतर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पण, त्यांच्या लग्नाला सेन्हाच्या वडिलांनी विरोध दर्शवला. 

स्नेहा ही हैदराबादच्या एका प्रसिद्ध व्यावसायिकाची मुलगी आहे. जेव्हा अल्लू अर्जूनचे वडील हे लग्नाचा प्रस्ताव घेऊन  स्नेहाच्या घरी गेले आणि त्यांच्या लग्नाबद्दल बोलले.  तेव्हा मात्र स्नेहाच्या वडिलांनी लग्नास नकार दिला. पण अल्लु आणि स्नेहा एकमेकांशिवाय राहू शकत नव्हते. त्यांनी घरातल्यांची समजूत काढली. अखेर स्नेहाच्या हट्टाखातर आणि अल्लू अर्जुनच्या विनंतीनंतर तिच्या कुटुंबीयांनी लग्नास होकार दिला. यानंतर ६ मार्च २०११ रोजी दोघांनी थाटामाटात लग्न केलं.

 

English
हिंदी सारांश
Web Title : Allu Arjun gifts wife luxury car on 15th anniversary.

Web Summary : Allu Arjun gifted his wife, Sneha Reddy, a Mercedes-Benz on their 15th anniversary. The luxury car, worth approximately ₹1.81 crore, was presented in a heartwarming family moment. The couple celebrated their enduring love with emotional posts and photos, marking a journey that began with a chance meeting and overcame initial family opposition.
टॅग्स :अल्लू अर्जुनबॉलिवूड