'पुष्पा २' फेम अल्लू अर्जुनच्या घरावर काल अज्ञात लोकांनी हल्ला केला. अल्लू अर्जुनच्या हैदराबादमधील ज्युबली हिल्स येथील घरावर रविवारी (दि.२२) उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या (जेएसी) सदस्यांनी दगडफेक आणि टोमॅटो फेकले. याप्रकरणी पोलिसांनी आठ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. या सदस्यांनी अल्लू अर्जुनच्या घरी जबरदस्तीने घुसण्याचा प्रयत्न केला होता. अखेर या संपूर्ण प्रकरणावर अल्लू अर्जुनच्या वडिलांनी मौन सोडलंय.
अल्लू अर्जुनचे वडील मीडियाशी संवाद साधताना म्हणाले की, "आमच्या घरी आज काय झालं ते सर्वांनी पाहिलं. आता वेळ आलीय की आम्ही चांगल्या पद्धतीने आमचं काम करण्याची. कोणत्याही गोष्टीवर प्रतिक्रिया द्यायची ही योग्य वेळ नाही याची आम्हाला जाणीव आहे. पोलिसांनी आम्हाला त्रास देणाऱ्या माणसांना अटक केली असून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केलाय."
अल्लू अर्जुनचे वडील पुढे म्हणाले की, "आमच्या इथे येऊन जो कोणी हंगामा करेल त्याला अटक करण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. कोणीही अशा घटनांना सपोर्ट केला नाही पाहिजे. इथे मीडिया असल्याने मी प्रतिक्रिया देणं बरोबर नाही. कायदा त्याचं काम करेल." अशाप्रकारे अल्लू अर्जुनच्या वडिलांनी या संपूर्ण प्रकरणावर मौन सोडलंय. दरम्यान काल उस्मानिया विद्यापीठाच्या संयुक्त कृती समितीच्या सदस्यांनी अल्लू अर्जुनच्या घरावर दगडफेक आणि टोमॅटो फेकले. यावेळी त्यांनी संध्या थिएटरमध्ये झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणातील मृत महिलेच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली.