Join us
Daily Top 2Weekly Top 5

हर्षदीप कौरबरोबर आलिया भटने गायले 'इक कुडी...' गाणे

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 07:15 IST

स्टार प्लस वाहिनीवरील द व्हॉईस कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमधील स्पर्धकांनी आपल्या स्वरसाजाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे.

स्टार प्लस वाहिनीवरील द व्हॉईस कार्यक्रमाला रसिकांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. या शोमधील स्पर्धकांनी आपल्या स्वरसाजाने रसिकांचे लक्ष वेधून घेतले आहे. नुकतेच या कार्यक्रमात 'कलंक' चित्रपटातील कलाकार वरूण धवनआलिया भट यांनी हजेरी लावली होती. यावेळी आलिया भटने या कार्यक्रमाची प्रशिक्षिका हर्षदीप कौर हिच्याबरोबर या चित्रपटातील 'इक कुडी'हे गाणे गायले.

आलिया भट ही गुणी अभिनेत्रीच नव्हे, तर एक चांगली गायिकाही आहे. त्यामुळे ती 'इक कुडी' हे गाणे गात असताना सारा प्रेक्षक तिच्याकडे पाहत होता. प्रशिक्षिका हर्षदीप कौरने आलियाला गाण्यासाठी प्रोत्साहित केले आणि नंतर तिचा धीर कायम ठेवण्यासाठी तिनेही तिच्याबरोबर हे गाणे गायले. या दोघींच्या सुरेल आवाजाने सर्वांवर मोहिनी टाकली आणि प्रेक्षकांनी त्यांना पुन्हा एकवार गाण्याची मागणी केली.

याशिवाय या कार्यक्रमातील स्पर्धकांना व उपस्थितांना आलिया भटचा डान्सही पाहायला मिळाला. या कार्यक्रमातील एक स्पर्धक सिमरन ही आलिया भटची मोठी चाहती आहे. तिने या चित्रपटातील 'घर मोरे परदेसिया' या गाण्यावर कसा डान्स करायचा, ते दाखविण्याची विनंती आलियाला केली. आलियानेही ही विनंती तात्काळ मान्य केली आणि सिमरनची इच्छा पूर्ण केली.

आलिया म्हणाली, ''घर मोरे परदेसिया' या गाण्यावरील हा पदन्यास शिकण्यास मला अडीच महिने लागले. आता मी तुला हा नाच शिकवीत असताना तुला तो लक्षात ठेवता आला, तर मला खरंच आनंद वाटेल.'

टॅग्स :आलिया भटद व्हॉइस शोकलंकवरूण धवन