Join us

तारीख ठरली, टीझरही आला! आलिया भट्टचा गंगुबाई काठियावाडी ‘या’ OTT प्लॅटफॉर्मवर पाहता येणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 20, 2022 21:53 IST

आलिया भट्टची प्रमुख भूमिका असलेला गंगुबाई काठियावाडी हा सिनेमा लवकरच ओटीटी प्लॅट फॉर्मवर पाहायला मिळणार आहे.

मुंबई: बॉलिवूडमधील स्टार किड असलेल्या  रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि अभिनेत्री आलिया भट्ट (Alia Bhatt) यांचा विवाह सोहळा अलिकडेच पार पडला. या सोहळ्याला अनेल बॉलिवूड सेलिब्रिटींनी हजेरी लावली होती. आता पुन्हा एकदा आलिया भट्ट चर्चेत आली आहे. याचे कारण म्हणजे आलिया भट्टचा गंगुबाई काठियावाडी (Gangubai Kathiawadi) हा सिनेमा आता OTT प्लॅटफॉर्मवर पाहायला मिळणार आहे. याचा एक टीझरही प्रदर्शित झाला आहे. 

२५ फेब्रुवारी रोजी हा सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित झाला. त्यानंतर काही काळातच हा सिनेमा ओटीटी प्लॅटफॉर्मवर येणार असल्याची चर्चा होती. आता अखेर या सिनेमाच्या ओटीटीवर येण्याची तारीख ठरली आहे. या चित्रपटाने आतापर्यंत जवळपास १३० कोटींची कमाई केली आहे. या चित्रपटात आलियाच्या अभिनयाचे खूप कौतुक झाले. ‘गंगूबाई काठियावाडी’नंतर ‘द काश्मीर फाइल्स’ आणि त्यानंतर ‘आरआरआर’ या सिनेमांमुळे गंगुबाई काठियावाडी या सिनेमाच्या कमाईला ब्रेक लावल्याचे पाहायला मिळाले. 

कुठे आणि कधी पाहता येणार गंगुबाई काठियावाडी

गंगूबाई काठियावाडी सिनेमाने मोठ्या पडद्यावर सगळ्यांची मने जिंकली होती. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांना ओटीटी प्लॅट फॉर्मवर पाहायला मिळणार आहे. आता हा सिनेमा अखेर नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होत आहे. २६ एप्रिल रोजी हा चित्रपट तुम्हाला नेटफ्लिक्सवर पाहता येणार आहे. एक टीझर शेअर करत नेटफ्लिक्सने ही माहिती दिली आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन संजय लीला भन्साळी यांनी केले आहे. या सिनेमात आलिया भट्टसह अजय देवगण आणि शंतनू मुखर्जी यांनीही भूमिका साकारल्या होत्या.

टॅग्स :बॉलिवूडआलिया भटनेटफ्लिक्ससेलिब्रिटी