Join us
Daily Top 2Weekly Top 5

आलिया भटने प्रोडक्शन हाऊससाठी भाड्याने घेतली जागा, मोजावे लागणार लाखो रुपये

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 10:02 IST

मुंबईतील उच्चभ्रू ठिकाणी तिने ही जागा भाड्यावर घेतली आहे.

बॉलिवूड अभिनेत्री आणि कपूर कुटुंबाची सून आलिया भटची (Alia Bhatt) स्वत:ची निर्मिती कंपनी आहे. 'इटर्नल सनशाईन प्रोडरक्शन्स' (Eternal Sunshine Productions) असं तिच्या निर्मिती कंपनीचं नाव आहे. आलिया आई सोनी राजदान भट्ट आणि बहीण शाहीन भट्ट या दोघी ही कंपनी सांभाळतात. नुकतंच आलियाने प्रोडक्शन हाऊससाठी नवी जागा भाड्यावर घेतली आहे. यासाठी तिला दर महिन्याला लाखो रुपये मोजावे लागणार आहेत.

बांद्रा येथील पाली हिल हा भाग अतिशय पॉच आणि उच्चभ्रू आहे. अनेक सेलिब्रिटींची या भागात घरं आणि ऑफिसही आहेत. मिडिया रिपोर्टनुसार, आलियानेही तिच्या प्रोडक्शन हाऊससाठी पाली हिल येथेच जागा भाड्यावर घेतली आहे. याचं प्रतिमहिना भाडं तब्बल ९ लाख रुपये आहे. तसंच दरवर्षी हे भाडं ५ टक्क्यांनी वाढणार आहे. ही जागा पाली हिल येथील नर्गिस दत्त रोडवर वास्तु इमारतीत सहाव्या मजल्यावर आहे. विशेष म्हणजे आलिया सध्या कुटुंबासह याच इमारतीत राहते. 

इंडेक्सटॅप च्या रिपोर्टनुसार, आलियाच्या कंपनीने हा करार ४ वर्षांसाठी केला आहे. २१ फेब्रुवारी रोजी हा करार झाला. नरेंद्र शेट्टी यांच्याकडून आलियाच्या कंपनीने ही प्रॉपर्टी घेतली आहे. तसंच यासाठी तिने तब्बल ३६ लाख रुपये डिपॉझिट दिले आहेत. 

आलियाच्या निर्मितीसंस्थेअंतर्गत आतापर्यंत अनेक सिनेमे आले आहेत. 'डार्लिंग्स' हा त्यांचा पहिला सिनेमा होता ज्याची आलियाने निर्मिती केली. तसंच यात तिने अभिनयही केला होता. याशिवाय गेल्यावर्षी आलेल्या 'जिगरा'ही त्यांनीच निर्मित केला आणि आलियाने अभिनयही केला. २०१९ मध्ये आलियाने या ही निर्मिती कंपनी सुरु केली. 

टॅग्स :आलिया भटमुंबईबॉलिवूड