ठळक मुद्देआलिया ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुली असल्याची टीका कंगनाने केली होती.
कंगना राणौत काही दिवसांपूर्वी रणवीर सिंग, आलिया भट्ट आणि रणबीर कपूर अशा तिघांवरही जाम भडकली होती. देशाच्या राजकीय मुद्यांवर न बोलणा-या या तिघांना कंगनाने बेजबाबदार ठरवले होते. कंगनाच्या या टीकेला आता आलिया भट्टने उत्तर दिलेय. अर्थात कंगनाच्या तो-यात नव्हे तर अतिशय संमजसपणाने. कंगनाच्या टीकेबद्दल छेडले असता, आलियाने अगदी विचारपूर्वक उत्तर दिले. कंगनासारखे बेधडक बोलणे मला जमणारे नाही. तिच्या जागी ती योग्य असेलही. पण कधी कधी आम्ही कलाकार एक पाऊल मागे घेतो. प्रत्येक मुद्यावर उगाच का बोलावे, असे आम्हाला वाटते. माझे म्हणाल तर, मलाही माझी स्वत:ची मते आहेत. पण मी ती माझ्यापुरतीच ठेवते. जगात प्रत्येक जण प्रत्येक गोष्टीवर आपले विचार मांडतो. अशात तू तुझे मत मांडले नाहीस, तर त्याने काहीही फरक पडणार नाही, असे माझे पापा मला नेहमी म्हणतात. कंगना आपले विचार बेधडक मांडते, मला तिच्या विचारांचा आदर आहे, , असे आलिया म्हणाली.
{{#allowed}} {{#config.logo.enabled}}
{{/config.logo.enabled}}
{{/allowed}} काही दिवसांपूर्वीच कंगना आलियावर बिथरली होती. इंडस्ट्रीने कायम माझ्याकडे दुर्लक्ष केलेय. माझ्या मुव्ही ट्रायलमध्ये कुणीही येत नाही. पण त्यांची वेळ येते तेव्हा लाजलज्जा सोडून मला फोन करतात आणि बोलवतात.अलीकडे मी सुद्धा त्यांच्या चित्रपटांच्या स्क्रिनिंगला जाणे सोडले आहे. आलियाने मला राजीचा ट्रेलर पाठवत, तो बघण्याची विनंती केली होती. हा ट्रेलर पाहिल्यानंतर मी मेघना गुलजार आणि आलिया दोघींनाही स्वत:हून फोन केला. पण माझ्या चित्रपटाबद्दल मात्र त्यांच्या तोंडून एक शब्दही निघाला नाही. हे सगळे लोक संधीसाधूू आहेत. हे सगळे माझ्याविरोधात कटकारस्थान रचतात, असे कंगना म्हणाली होती. इतके कमी की काय, म्हणून आलिया ही करण जोहरच्या हातचे कळसूत्री बाहुली असल्याची टीका कंगनाने केली होती.