Join us
Daily Top 2Weekly Top 5

Dhurandhar स्टार अक्षय खन्नाबद्दल अमीषा पटेलची पोस्ट; म्हणाली "'सगळ्यांना अचानक त्याच्याबद्दल..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 15:50 IST

अमिषा पटेल हिने शेअर केलेली पोस्ट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे.

चित्रपटसृष्टीतील सर्वात प्रतिभावान पण 'अंडररेटेड' मानला जाणारा अभिनेता अक्षय खन्ना सध्या सोशल मीडियावर ट्रेंड होत आहे. दिग्दर्शक आदित्य धर यांच्या 'धुरंधर' या चित्रपटामध्ये अक्षयने साकारलेली 'रेहमान डकैत' ही नकारात्मक भूमिका प्रेक्षकांच्या अंगावर काटा आणणारी ठरली आहे. अक्षयच्या या जबरदस्त कमबॅकनंतर त्याची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री अमिषा पटेल हिने शेअर केलेली पोस्ट सध्या इंटरनेटवर चर्चेचा विषय बनली आहे.

अमिषा पटेलने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट शेअर करत अक्षय खन्नाचे तोंडभरून कौतुक केले आहे. अमिषाने आपल्या पोस्टमध्ये लिहिले, "जर तुम्हाला सोशल मीडियावर ट्रेंड करायचा असेल तर अक्षय खन्नाबद्दल बोला आणि जर तुम्हाला एखादा चित्रपट हिट व्हायचा असेल, तर त्याला कास्ट करा! 'ब्रँड अक्षय'ने अखेर सर्वांचे डोळे उघडले आहेत असं वाटतंय. वर्षानुवर्षे जे लोक आंधळे होते, त्यांना अचानक त्याच्याबद्दल प्रेम उफाळून आलंय आणि त्याच्यात टॅलेंट दिसू लागले आहे. पीआरद्वारे नाहीतर अभिनयातून तू सगळ्यांनाच जोरदार चपराक बसवली आहेस. मला तुझा अभिमान आहे", अशी रोखठोक पोस्ट शेअर केली आहे. 

'धुरंधर' हा चित्रपट खऱ्या घटनांवर आधारित असून यात रणवीर सिंग देखील मुख्य भूमिकेत आहे. मात्र, अक्षय खन्नाच्या क्रूर आणि वास्तववादी अभिनयाने रणवीर सिंगलाही मागे टाकले आहे. रणवीर सिंग आणि अक्षय खन्नाशिवाय 'धुरंधर'मध्ये संजय दत्त, अर्जुन रामपाल, आर. माधवन, सारा अर्जुन आणि राकेश बेदी हे महत्त्वाच्या भूमिकेत दिसले आहेत.  या चित्रपटातील कास्टिंग आणि कलाकारांच्या  परफॉर्मन्सचं सुद्धा आता सगळीकडे कौतुक होताना दिसतंय. कास्टिंग दिग्दर्शक मुकेश छाब्रा यांनी खुलासा केलाय धुरंधरची कास्टिंग फायनल करण्यासाठी आदित्य धर यांना जवळपास वर्षभराचा कालावधी लागला होता.

 बॉक्स ऑफिसवर 'धुरंधर'चा धुमाकूळअक्षय खन्नाने आपल्या कारकिर्दीत अनेक चढ-उतार पाहिले. मात्र, 'धुरंधर'ने पुन्हा एकदा सिद्ध केले आहे की, अक्षय खन्नासारखा अभिनेता जेव्हा मोठ्या पडद्यावर येतो, तेव्हा तो सर्वांचे लक्ष वेधून घेतो.  अक्षय खन्नाचा अभिनय प्रेक्षकांना थिएटरकडे खेचण्यात यशस्वी ठरला आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, ‘धुरंधर’चे भारतातील एकूण कलेक्शन ३७८.७५ कोटी रुपये झाले आहे.चित्रपट अजूनही बॉक्स ऑफिसवर दमदार कमाई करत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना फारच भावला आहे.  येत्या काही दिवसांत हा चित्रपट ४०० कोटींच्या क्लबमध्ये सामील होईल आणि 'छावा'नंतर असे करणारा या वर्षातील दुसरा चित्रपट ठरेल.

English
हिंदी सारांश
Web Title : Ameesha Patel praises Akshay Khanna's 'Dhurandhar', calls out 'blind' critics.

Web Summary : Ameesha Patel lauded Akshay Khanna's performance in 'Dhurandhar' as Rehman Dakait. She criticized those newly appreciating his talent, suggesting his acting prowess has silenced doubters. 'Dhurandhar' stars Ranveer Singh but Khanna's performance stands out, contributing to the film's ₹378.75 crore box office success.
टॅग्स :अक्षय खन्नाधुरंधर सिनेमाअमिषा पटेल