Join us

Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding : तुझ्यात जीव रंगला ! अक्षया हार्दिक आज लग्नगाठ बांधणार 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 2, 2022 09:58 IST

अखेर तो दिवस आला आहे. टीव्ही वरील लोकप्रिय जोडी पाठकबाई आणि राणादा म्हणजेच हार्दिक आणि अक्षया आज लग्नबंधनात अडकत आहेत.

Akshaya Deodhar & Hardeek Joshi Wedding : अखेर तो दिवस आला आहे. टीव्ही वरील लोकप्रिय जोडी पाठकबाई आणि राणादा म्हणजेच हार्दिक आणि अक्षया आज लग्नबंधनात अडकत आहेत. सध्या या दोघांच्या लग्नाच्या तयारीचे फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत होते. हळद, मेहेंदी आणि संगीत अशा सर्व सोहळ्याचे फोटो पाहून चाहतेही खुश झाले. कधी एकदा या दोघांना वर वधू च्या वेशात बघतोय याचीच उत्सुकता चाहत्यांना लागली आहे. 

 तर आज अक्षया आणि हार्दिकचा विवाहसोहळा अगदी शाही अंदाजात पार पडणार आहे. पुण्यातील सिद्धी गार्डन या ठिकाणी हा विवाहसोहळा पार पडणार आहे. लग्नाची लगबग सध्या तिथे सुरु झाली आहे. मांडव सजला आहे. फुलांची सुंदर सजावट केली आहे.  अक्षयाचा लुक कसा असेल याची उत्सुकताही ताणली आहे. 

अक्षयाने लग्नात लाल रंगाची नऊवारी नेसली असून त्यात की खुपच सुंदर दिसत आहे. नवरीचा साजश्रृंगार पाहून सर्वच दंग झाले आहेत. नथ, हिरवा चुडा, दागिने परिधान करुन अक्षया नटुनथटुन लग्नमंडपात आली आहे. 

मराठी सिनेसृष्टीतील अनेक कलाकार लग्नसोहळ्यामध्ये सहभागी होतील. चाहत्यांच्या पसंतीची ही ऑनस्क्रीन जोडी अखेर खऱ्या आयुष्यातही लग्नबंधनात अडकणार हे बघून चाहते शुभेच्छा देत आहेत.

टॅग्स :अक्षया देवधरहार्दिक जोशीलग्नतुझ्यात जीव रंगलामराठी अभिनेता