‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्या दिवशी ‘केसरी’ने देशात २१. ५० कोटींची कमाई केली. ही कमाई यासाठीही उल्लेखनीय आहे कारण, काल होळीच्या दिवशी सकाळी ‘केसरी’चे फार कमी शो होते. बहुतांश शो संध्याकाळचे होते. पण याऊपरही ‘केसरी’ने बाजी मारली आणि हा चित्रपट अक्षय कुमारच्या करिअरमधील पहिल्या दिवशी सर्वाधिक कमाई करणारा दुसरा चित्रपट बनला. ( गतवर्षी रिलीज झालेल्या अक्षयच्या ‘गोल्ड’ने पहिल्या दिवशी २५.२५ कोटी कमाई केली होती. हा चित्रपट स्वातंत्र्यदिनाच्या मुहूर्तावर रिलीज झाला होता.)
बॉक्सऑफिसवर ‘केसरी’ची सरशी! पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2019 14:00 IST
‘सारागढी’च्या युद्धाची वीरगाथा मांडणारा अक्षय कुमारचा ‘केसरी’ हा सिनेमा जगभरातील ४२०० स्क्रिन्सवर प्रदर्शित झाला आणि पहिल्याच दिवशी या चित्रपटाने इतिहास रचला. पहिल्या दिवशी ‘केसरी’ने देशात २१. ५० कोटींची कमाई केली.
बॉक्सऑफिसवर ‘केसरी’ची सरशी! पहिल्याच दिवशी विक्रमी कमाई!!
ठळक मुद्देगुरुवारी रिलीज झालेल्या ‘केसरी’ला चार दिवसांचा वीकेंड मिळणार आहे. समीक्षकांची दाद आणि प्रेक्षकांची माऊथ पब्लिसिटी या जोरावर ‘केसरी’कडून बक्कळ कमाईची अपेक्षा केली जात आहे.