Join us
Daily Top 2Weekly Top 5

हर हर महादेव! केदारनाथला पोहोचला अक्षय कुमार, भोलेनाथांच्या भक्तीत तल्लीन; व्हिडीओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2023 18:05 IST

केदारनाथ मंदिराच्या बाहेर येऊन अक्षयने 'जय बाबा भोलेनाथ'चा जयघोष केला.

अक्षय सध्या उत्तराखंडच्या दौऱ्यावर असून तो बाबा केदारनाथच्या दर्शनासाठी आला होता. अक्षय कुमारने आजूबाजूला उंच डोंगरांमध्ये केदारनाथ मंदिराचे दृश्य शेअर केले आणि लिहिले आहे, 'जय बाबा भोलेनाथ.' केदारनाथ मंदिराच्या आतून दर्शन घेऊन बाहेर येत असल्याचा अक्षय कुमाराचा व्हिडिओ समोर आला आहे. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर अक्षयने हात जोडून 'जय भोलेनाथ'चा जयघोष करताना दिसतो.

मंदिरात अक्षयच्या आजूबाजूला मोठी गर्दी दिसत आहे आणि अक्षय त्यांच्यासोबत अगदी आरामात उभा असल्याचे दिसत आहे. अक्षय कुमारसाठी तिथे सुरक्षा व्यवस्थाही तैनात करण्यात आली असली तरी मंदिरात तो सर्वसामान्य भाविकांसह त्याच्या रंगात रंगलेला दिसतो.

अक्षयने  विधींवत बाबांची अभिषेक पूजा केली. दर्शनानंतर अक्षयने मंदिर परिसरात आपल्या चाहत्यांना अभिवादन केले. त्याच्यासोबत  सेल्फी आणि फोटोसाठी मंदिर परिसरात गर्दी केली होती. मात्र, सुरक्षा कर्मचाऱ्यांमुळे तो फार जवळ जाऊ शकला नाही. काही वेळाने अक्षय कुमार हेलिकॉप्टरने परत गेला. 

अक्षय कुमार त्याच्या आगामी चित्रपटाच्या शूटिंगसाठी डेहराडूनमध्ये आहे. मंगळवारी तो हेलिपॅडने केदारनाथला पोहोचला होता. तिथं जाऊन दर्शन घेतलं आणि त्यानंतर तो शूटिंगच्या ठिकाणी परतला. नुकतेच अक्षय कुमारचे 'क्या लोगे तुम' हे गाणं रिलीज झालं आहे. हे गाणं अक्षय आणि अमायरा दस्तूर यांच्यावर चित्रित करण्यात आले आहे.

टॅग्स :अक्षय कुमारकेदारेश्वर मंदिर