Akshay Kumar's Daughter Nitara: बॉलिवूमध्ये असे अनेक अभिनेते आहेत ज्यांची मुलं अगदीच त्यांची कॉपी आहेत व हुबेहूब त्यांच्यासारखेच दिसतात. बॉलिवूडचा लोकप्रिय अभिनेता अक्षय कुमारची मुलगी नितारादेखील अगदी कार्बन कॉपी आहे. नुकतंच अक्षय आपल्या लेकीसोबत आयएसपीएलचा अंतिम सामना ( १५ फेब्रुवारी) पाहायला मिळाला. ज्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
अक्षयच्या मुलीचं नाव नितारा आहे. निताराचे फोटो पाहिल्यानंतर लोकांनी काही चाहत्यांनी तिला अक्षय कुमारची कार्बन कॉपी म्हटलं आहे. पण, काही जण ती आई ट्विंकल खन्नाची कार्बन कॉपी, तर काही जण ट्विंकलची डुप्लिकेट असल्याचं म्हणत आहेत. समोर आलेल्या व्हिडीओमध्ये अक्षय कुमार आणि नितारा यांच्यात खूप छान बॉन्डिंग दिसून येतंय नितारा लाइमलाइटच्या दुनियेपासून दूर असते. फक्त निताराचं नाही तर अक्षयचा मुलगा आरव देखील मीडियापासून दूर असतो.
अक्षय आणि ट्विंकल हे एक लोकप्रिय जोडपं आहे. दोघेही कायम चर्चेत असतात. ट्विंकल ही अभिनयापासून दूर आहे. तिनं लग्नानंतर अधिक वेळ कुटुंबाला दिला. तर अक्षयच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर अक्षय कुमारच्या कामाबद्दल बोलायचं झालं तर तो लवकरच 'भूत बंगला' निमित्ताने अनेक वर्षांनी हॉरर कॉमेडी सिनेमात झळकणार आहे. अक्षय, तबू आणि मिथिला व्यतिरिक्त या सिनेमात परेश रावल, राजपाल यादव, असरानी आणि वामिका गब्बी हे देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अक्षय कुमार, शोभा कपूर, आणि एकता आर. कपूर यांनी केली आहे. प्रियदर्शन दिग्दर्शित हा चित्रपट २ एप्रिल २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. सध्या अक्षय कुमार त्याच्या 'स्काय फोर्स' या चित्रपटामुळे चर्चेत आहे.