Join us
Daily Top 2Weekly Top 5

Akshay Kumar : 'पान मसालाची जाहिरात ही आयुष्यातली मोठी चूक', अक्षय कुमारची जाहीर कबुली

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2023 10:53 IST

त्या जाहिरातीवर अक्षय कुमार म्हणतो, हो मी एक चूक केली आहे.

Akshay Kumar :  खिलाडी अक्षय कुमार नेहमीच प्रोफेशनल आणि वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत असतो. सध्या त्याचे एकामागोमाग एक सर्वच सिनेमे फ्लॉप होत आहेत. नुकताच रिलीज झालेला 'सेल्फी' हा सिनेमा देखील बॉक्सऑफिस वर कमाल दाखवू शकला नाही. तर दुसरीकडे त्याने एका नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत आयुष्यातील सर्वात मोठी चूक कोणती याचा खुलासा केला आहे. ज्याचा आज पश्चात्ताप होत असल्याचंही त्याने म्हणलं आहे.

आज तकला दिलेल्या 'सीधी बात' या मुलाखतीत अक्षयने आतापर्यंतची सर्वात मोठी चूक कोणती यावर उत्तर दिलं आहे. तो म्हणाला, 'हो मी एक चूक केली आहे. मी ती कबूलही केली होती. जसं की मी ती पान मसालाची जाहिरात केली होती. ती माझी चूक होती. मी ती मान्यही केली. त्या रात्री मला झोपही आली नाही आणि अस्वस्थ वाटत होते. तेव्हाच मी लिहिले मनातलं सर्व काही लिहिलं. मला वाटतं प्रत्येक जण चुकांमधून शिकत असतो. मीही शिकलो. मी चूक मान्य केल्यानंतर ती गोष्ट निवळली होती.

पान मसालाची जाहिरात केल्याने अक्षय सोशल मीडियावर चांगलाच ट्रोल झाला होता. त्याने ट्वीट करत चूक मान्य केली होती. मला अनेक गुटखा कंपनीच्या जाहिरातीसाठी ऑफर्स येतात. त्यासाठी मोठी रक्कमही मिळणार असते. मात्र स्वस्थ भारतासाठी मी असे काम करणार नाही असं तो २०१८ मध्येत म्हणाला होता. मात्र पुढच्या ४ च वर्षात त्याने स्वत:चीच गोष्ट खोटी ठरवत पान मसालाची जाहिरात केली. हे काही चाहत्यांना रुचले नाही आणि तो भलताच ट्रोल झाला. यानंतर त्याने त्याची चूक मान्य केली आणि ते ट्वीट केले.

टॅग्स :अक्षय कुमारबॉलिवूडमुलाखत