Join us

अक्षय कुमारच्या 'हे बेबी' मधली 'एंजल' आता मोठी झाली, १९ वर्षांच्या जुआनाचे फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2023 13:11 IST

आता इतक्या वर्षांनी ती चिमुकली कशी दिसते पाहा.

अक्षय कुमारचा 'हे बेबी' (Hey Baby) सिनेमा आठवत असेलच. यामध्ये रितेश देशमुख, फरदीन खान, विद्या बालन आणि बोमन इरानी यांच्याही भूमिका होत्या. तर शाहरुख खानने गेस्ट अॅपिअरन्स केला होता. या सिनेमात अवघ्या काही महिन्यांची 'एंजल' ही चिमुकलीही असते. ही मुलगी कोणाची आहे हे माहित नसताना अक्षय कुमार, रितेश आणि फरदीन तिचा सांभाळ करतात. या क्युट मुलीने प्रेक्षकांचं मन जिंकलं होतं. आता इतक्या वर्षांनी ती चिमुकली कशी दिसते पाहा.

'हे बेबी' मध्ये जुआना संघवीने (Juana Sanghvi) छोट्या मुलीची भूमिका केली होती.  त्यात तिचं गोड हसू,क्युट चेहरा, तिचं रडणं सगळंच खूप छान होतं. प्रेक्षकांना तर ही क्युट मुलगी आजही लक्षात आहे. तर आता जुआना १९ वर्षांची झाली आहे. तिचे काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. ज्यात ती आजही तितकीच क्युट दिसत आहे.

जुआनाचा २२ मार्च २००४ रोजी राजस्थानच्या कोटा येथे जन्म झाला. तिने केवळ 'हे बेबी' मध्ये चाईल्ड अॅक्ट्रेस म्हणून अभिनय केला आहे. तिने नुकत्याच पोस्ट केलेल्या फोटोंमध्ये ती आईवडिलांबरोबर दिसत आहे. निळ्या रंगाचा सुंदर ड्रेस परिधान केलेली जुआना आजही तितकीच गोड हसते. काही फोटोंमध्ये ती तिच्या मित्रपरिवासासोबत दिसत आहे. 

अक्षय कुमारच्या या मल्टीस्टारर सिनेमाने ८० कोटींचा गल्ला जमवला होता. बजेटच्या दुप्पट सिनेमाने कमाई केली होती. 2007 साली हा सिनेमा प्रदर्शित झाला होता.

 

टॅग्स :अक्षय कुमाररितेश देशमुखफरदीन खानविद्या बालनबॉलिवूड