अक्षय कुमार व परिणीती चोप्राचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. हा शानदार आणि धमाकेदार ट्रेलर लोकांना प्रचंड भावला आणि बघता बघता सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. यासोबतच या ट्रेलरवरचे मजेदार मीम्सही व्हायरल झालेत. होय, अक्षयच्या ‘केसरी’च्या ट्रेलरची नेटक-यांनी जोरदार खिल्ली उडवली.‘केसरी’मध्ये अक्षय कुमार ईशन सिंगची भूमिका साकारताना दिसणार आहे. ‘केसरी’ सिनेमा १८९७ साली झालेल्या सारागढी युद्धावर आधारीत आहे. भारताच्या इतिहासात लढलेली सर्वात धाडसी आणि अविश्वसनीय लढाई अशा शब्दात नेहमीच सारागढीच्या युद्धाचे वर्णन केले जाते. १० हजार सैन्याच्या रुपाने मृत्यू समोर असतानाही न डगमगता या २१ वीरांनी अखेरच्या श्वासांपर्यंत लढा देत आपले नाव इतिहासात सुवर्णाक्षरात अजरामर केले. या शौर्यगाथेची झलक केसरीच्या ट्रेलरमध्ये पहायला मिळते. करण जोहरच्या धर्मा प्रॉडक्शन निर्मित व अनुराग सिंग दिग्दर्शित ‘केसरी’ येत्या २१ मार्चला प्रदर्शित होतोय. तत्पूर्वी ‘केसरी’च्या ट्रेलरवरचे मीम्स तुम्ही-आम्ही पाहायलाच हवेत....
Memes Viral : नेटक-यांनी अशी उडवली अक्षय कुमारच्या ‘केसरी’च्या ट्रेलरची खिल्ली!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 22, 2019 10:30 IST
अक्षय कुमार व परिणीती चोप्राचा बहुप्रतिक्षीत चित्रपट ‘केसरी’चा ट्रेलर प्रदर्शित झालाय. हा शानदार आणि धमाकेदार ट्रेलर लोकांना प्रचंड भावला आणि बघता बघता सोशल मीडियावर ट्रेंड करू लागला. यासोबतच या ट्रेलरवरचे मजेदार मीम्सही व्हायरल झालेत.
Memes Viral : नेटक-यांनी अशी उडवली अक्षय कुमारच्या ‘केसरी’च्या ट्रेलरची खिल्ली!!
ठळक मुद्दे. ‘केसरी’ सिनेमा १८९७ साली झालेल्या सारागढी युद्धावर आधारीत आहे. भारताच्या इतिहासात लढलेली सर्वात धाडसी आणि अविश्वसनीय लढाई अशा शब्दात नेहमीच सारागढीच्या युद्धाचे वर्णन केले जाते.