जमाना वेब सीरिजचा आहे. वेबच्या जगात येण्यास बडे बडे स्टार उत्सूक आहेत. अशात अक्षय कुमार कसा मागे राहणार. तोही डेब्यू करण्यासाठी आला. अक्षयची पहिली वेब सीरिज अॅक्शन स्टंटवर आधारित आहे. तूर्तास ‘द एंड’ असे तात्पुरते नाव या वेबसीरिजला देण्यात आले आहे. पण बातमी ही नाही.आज अक्षयने आपल्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. या इव्हेंटमध्ये तो रॅम्पवर उरतला. तो सुद्धा एका धमाकेदार स्टंटसह. होय, अक्षयने आपल्या संपूर्ण शरीराला आग लावली अन् तो रॅम्पवर उतरला. अर्थात हे करताना, संपूर्ण काळजी घेण्यात आली होती. आगीमुळे शरीर पोळू नये यासाठी अक्षयच्या शरीरावर लेपही लावण्यात आला होता. पण तरिही अक्षयचा हा स्टंट पाहून अनेकांच्या हृदयाचा ठोका चुकला. ट्विंकलची स्थिती तर त्याहूनही खराब झाली.
अक्षय कुमारची अग्निपरीक्षा...! फोटो पाहून संतापली पत्नी ट्विंकल; ट्विटरवर घेतला क्लास!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 6, 2019 10:15 IST
आज अक्षयने आपल्या पहिल्या वेबसीरिजची घोषणा केली. या इव्हेंटमध्ये तो रॅम्पवर उरतला. तो सुद्धा एका धमाकेदार स्टंटसह. होय, अक्षयने आपल्या संपूर्ण शरीराला आग लावली अन् तो रॅम्पवर उतरला.
अक्षय कुमारची अग्निपरीक्षा...! फोटो पाहून संतापली पत्नी ट्विंकल; ट्विटरवर घेतला क्लास!!
ठळक मुद्दे पापा, तुम्हाला हे करावेच लागेल, असे आरव मला म्हणाला आणि म्हणून मी ही वेबसीरिज करण्याचा निर्णय घेतला, असे अक्षयने यावेळी सांगितले.