Join us

अक्षय कुमारने पत्नी ट्विंकल खन्नासोबतचा शेअर केला रोमाँटिक फोटो, यूजर्स म्हणाले- 'बेस्ट कपल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2021 17:38 IST

अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत व्हॅकेशन एन्जॉय करतो आहे.

अभिनेता अक्षय कुमार पत्नी ट्विंकल खन्नासोबत व्हॅकेशन एन्जॉय करतो आहे. अक्षयने  ट्विंकलसोबत नुकताच एक फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत अक्षय आणि ट्विंकल एकमेकांच्या खूप क्लोज दिसतायेत. दोघांचा फोटो सोशल मीडियावर देखील व्हायरल होतो आहे. हा फोटो शेअर करताना अक्षयने लिहिले, महामारी दरम्यानच्या या सुट्ट्यांसाठी मी खूप आभारी आहे, #GratitudeIsTheBestAttitude #BeachTime असे हॅशटॅगसुद्धा त्याने या फोटोसोबत दिले आहेत. चाहत्यांना हा फोटो खूप आवडला आहे. त्यांनी लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका यूजरने या फोटोवर 'बेस्ट कपल' अशी कमेंट केली आहे तर बाकी यूजर्सनी हार्टवाले इमोजी पोस्ट केले आहेत. 

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाले तर अक्षय कुमार कतरिना कैफसोबत 'सूर्यवंशी' सिनेमात झळकणार आहे. 'सूर्यवंशी' हा चित्रपट २ एप्रिल २०२० ला प्रदर्शित होणार असल्याचं जाहीर करण्यात आले आहे.हा सिनेमा थिएटरमध्ये प्रदर्शित व्हावा अशीच निर्मात्यांची ईच्छा होती. त्यासाठी बराच वेळ निर्मांत्यांनी वाट पाहिली आहे. लॉकडाऊनमध्ये अनेक निर्मांत्यांना सिनेमा प्रदर्शित करण्यासाी ओटीटी प्लॅटफॉर्मचा आधारा घ्यावा लागला होता. मात्र सुर्यंवशी सिनेमाबाब असे झाले नाही. त्यामुळे रसिकांना हा सिनेमा पाहायचा असेल तर थिएटकरडे वळावे लागेल. त्यामुळे सिनेमाला लॉकडाऊनंतर किती प्रतिसाद मिळतो हेही पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमारट्विंकल खन्ना