Join us

या वृत्तामुळे अक्षय कुमार व रोहित शेट्टीमध्ये झाली मारामारी, हा घ्या पुरावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 12, 2019 18:05 IST

अक्षय कुमार व रोहित शेट्टी यांची मारामारी सोडवण्यासाठी पोलिसांना बोलवावे लागले.

बॉलिवूडमधील कलाकारांच्या फ्रेंडशीप, वादविवाद व कॅटफाईटच्या बातम्या बऱ्याचदा ऐकायला मिळतात. बऱ्याचदा हे वृत्त चुकीचं असतं. असंच काहीसं बॉलिवू़डमध्ये घडलं. अक्षय कुमाररोहित शेट्टी यांच्यामध्ये वाद झाले होते. वर्तमानपत्रात छापून आलेल्या बातमीनुसार, अक्षय कुमाररोहित शेट्टी यांच्यात सूर्यवंशी चित्रपटामुळे वाद झाले असून ते एकमेकांशी बोलत नाहीत. या वृत्तानंतर अक्षय कुमार व रोहित शेट्टीने या वृत्ताचं वेगळ्या स्टाईलमध्ये उत्तर दिलं. 

अक्षय कुमारने एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत तो रोहित शेट्टीसोबत मारामारी करताना दिसतो आहे आणि म्हणतोय की, त्याला आदेश मिळाला आहे आणि दोघांमध्ये भांडणं आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून अक्षयनं हे वृत्त फोल असल्याचं सांगण्याचा प्रयत्न केला आहे. या व्हिडिओत सुरूवातीला कतरिना कैफ कॅमेऱ्यात बातम्या सांगताना दिसते आहे आणि त्यानंतर ते दोघे एकमेकांसोबत मारामारी करू लागतात.

या भांडणात पोलिस आणि काही लोक येतात व त्यांची भांडणं सोडवण्याचा प्रयत्न करतात. अक्षय कुमारचा हा व्हिडिओ खूपच मजेशीर आहे. या व्हिडिओला खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. 

दिग्दर्शक रोहित शेट्टी अक्षय कुमार व कतरिना कैफला घेऊन सूर्यवंशी चित्रपट बनवतो आहे. हा चित्रपट पोलिसांवर आधारीत आहे. या चित्रपटात रणवीर सिंग पाहुणा कलाकार म्हणून दिसणार आहे.

टॅग्स :अक्षय कुमाररोहित शेट्टी