अक्षय कुमारच्या ‘सिंग इज ब्लिंग’ या चित्रपटाची अभिनेत्री एमी जॅक्सन हिने गत 23 सप्टेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला. आता मुलाला जन्म दिल्यानंतर एमी लग्न करणार आहे. लग्नापूर्वी एमी आई झाली. आता आई बनल्यानंतर ती जॉर्जची पत्नी होणार आहे. होय, पुढील वर्षी म्हणजे 2020 मध्ये जॉर्ज पानायिटूसोबत लग्न करण्याची तिची योजना आहे. ग्रीसमध्ये हे लग्न होणार असल्याचे कळतेय. यासाठी एमी व जॉर्ज यांनी लोकेशनही फायनल केल्याचे समजतेय. एका बीचसाईडला हा ग्रॅण्ड विवाहसोहळा होणार आहे. तोपर्यंत एमीचे बाळ काही महिन्यांचे होईल.
अक्षय कुमारची ही हिरोईन आधी बनली आई, आता करणार लग्न!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 27, 2019 08:00 IST
अक्षय कुमारच्या या हिरोईनने गत 23 सप्टेंबरला एका गोंडस मुलाला जन्म दिला.
अक्षय कुमारची ही हिरोईन आधी बनली आई, आता करणार लग्न!!
ठळक मुद्देएमी जॅक्सन मागील वर्षी रजनीकांतच्या ‘2.0’ मध्ये दिसली होती. एमीने ‘एक दिवाना था’या सिनेमातून आपल्या बॉलिवूड करिअरची सुरूवात केली होती.