Join us  

परश्याची हटके हेअरस्टाईल, म्हणाला, 'घर बंदुक बिरयानी' साठी दीड वर्ष...'

By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2023 10:17 AM

नागराजचा सिनेमा म्हणल्यावर वेगळं काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की. सिनेमात आकाशच्या लुकची चर्चा आहे.

अभिनेता आकाश ठोसर (Akash Thosar) सैराट (Sairat) सिनेमातून एका रात्रीत लोकप्रिय झाला. पहिल्याच चित्रपटात परशाची भूमिका साकारुन त्याने प्रेक्षकांच्या मनात घर केले. या चित्रपटानंतर त्याच्या फॅन फॉलोव्हिंगमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. आता तो लवकरच 'घर बंदुक बिरयानी' (Ghar Banduk Biryani) या सिनेमात झळकणार आहे. या चित्रपटातही तो एका हटके भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. विशेष म्हणजे आकाशचा लुक यामध्ये काहीसा वेगळा दिसतोय. याच लुकबद्दल त्याने एक खुलासा केला आहे.

'सैराट' नंतर आकाश पुन्हा नागराज मंजुळेंच्या 'घर बंदुक बिरयानी' सिनेमात मुख्य भुमिका साकारताना दिसणार आहे. नागराजचा सिनेमा म्हणल्यावर वेगळं काहीतरी पाहायला मिळणार हे नक्की. सिनेमात आकाशच्या लुकची चर्चा आहे. आकाश यामध्ये मजनु दिसतोय तसेच त्याचे केसही मोठे दिसत आहेत. यावर खुलासा करताना आकाश म्हणाला, 'सिनेमात लुक कसा असावा हे दिग्दर्शकच ठरवतो. माझं पात्र कसं दिसेल हे आधीच ठरलेलं असतं त्याप्रमाणे लुक केला जातो. मला या चित्रपटाबद्दल अण्णांनी सांगितलं तेव्हा मी खूप फीट होतो. सिक्स पॅक्स बनवले होते. पण त्यांनी मला सांगितलं की मी स्लिम दिसलो पाहिजे. सिक्स पॅक्स, मसल्स दिसायला नको. सिनेमाच्या नावाला तुझं पात्र कनेक्ट झालं पाहिजे. म्हणून मी पुन्हा मेहनत घेतली.'

आकाश पुढे म्हणाला, 'हेअलस्टाईलबाबत बोलायचं झालं तर मी दीड वर्ष केसच कापले नाहीत. माझे केस यापेक्षाही मोठे होते. कापून कापून ते आता इतके झाले आणि ठरलं की असेच केस ठेवायचे. अण्णांना माझा हा लुक आवडला. मगच शूटिंगला सुरुवात झाली.'

‘घर, बंदूक, बिरयानी’ या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झालाआणि ट्रेलरला प्रेक्षकांचा खूप चांगला प्रतिसाद दिला. येत्या ७ एप्रिल रोजी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

टॅग्स :आकाश ठोसरनागराज मंजुळेसायली पाटीलमराठी चित्रपट