Ajith Kumar wins Dubai 24H race : साउथ सुपरस्टार अभिनेता अजित कुमार यांनी "Dubai 24H" शर्यतीत विजय मिळवत देशाची मान उंचावली आहे. सरावादरम्यान अजित यांच्या कारचा भयंकर अपघात झाला होता. त्यांच्या रेसिंग कारचा चक्काचूर झाला होता. पण, त्यांचं मनोबल ढासाळलं नाही. मरणाच्या दारातून परत येत अजित कुमार यांनी आता प्रतिष्ठित स्पर्धेत तिसरे स्थान पटकावलं आहे. अभिनेत्याच्या शानदार विजयानंतर सुपरस्टार रजनीकांत, अभिनेता आर. माधवन यांच्यसह अनेकांनी त्यांचं कौतुक करत अभिनंदन केलं आहे.
अजित कुमार यांनी रेसिंगमध्ये विजय मिळवल्यानंतर भारतीय ध्वज फडकावून आपला विजय साजरा केला. अजित कुमार यांची स्वत: ची एक रेसिंग टीम आहे आणि त्यांच्या टीमचं नाव देकील अजित कुमार रेसिंग आहे. सोशल मीडियावर अजित कुमार यांच्या विजयाचे व्हिडीओ प्रचंड वेगाने व्हायरल होत आहेत. ज्यामध्ये ते टीमसोबत आनंदात उड्या मारताना आणि नाचताना पाहायला मिळत आहेत.
अजित कुमार यांच्या टीमनं त्यांच्या एक्स अकाऊंटवरून एक पोस्ट शेअर केली आहे. त्यात लिहलं, "अजित कुमारसाठी दुहेरी धक्का.' 991 श्रेणीत तिसरं स्थान आणि GT4 श्रेणीत स्पिरिट ऑफ द रेस. ब्रेक फेल झाल्यामुळे झालेल्या अपघातानंतर भारी असा कमबॅक आहे! #अजितकुमार #अजितकुमाररेसिंग #२४hदुबई #अॅक्रेसिंग #दुबईरेसवीकएंड #रेसिंग".
रजनीकांत यांनी अजित यांचे अभिनंदन केले आहे आणि लिहिले की, "तू शेवटी करुन दाखवलंस, देव तुला आशीर्वाद देवो". तर अभिनेता आर. माधवनने सोशल मीडियावर अजितसोबतचा एक फोटो करत त्याचं अभिनंदन केलं. "खूप अभिमान आहे... काय माणूस आहे. एकमेव अजित कुमार", या शब्दात आपल्या मित्राचं अभिनेत्यानं कौतुक केलं आहे.