Join us

थिएटरमध्ये प्रदर्शित होण्याआधीच 'या' ओटीटीने विकत घेतले 'रेड २'चे हक्क, कुठे बघाल?

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2025 11:33 IST

अजय देवगणच्या 'रेड 2' चित्रपटात रितेश देशमुख खलनायक भूमिकेत दिसणार आहे.

Ajay Devgn's Raid 2 OTT Release: बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) त्याच्या दमदार अभिनयासाठी ओळखला जातो. अभिनयाच्या जोरावर फक्त भारतातच नव्हे तर जगभरात नाव कमावलं. अभिनयाबरोबरच निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून देखील त्याने काम केलं आहे.  १९९१ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'फुल और कांटे' चित्रपटामधून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या अजयने त्याच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले आहेत. त्याच्या हीट चित्रपटांच्या यादीत २०१८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'रेड'चा (Raid) उल्लेख नक्कीच केला जाईल. आता या चित्रपटाच्या सिक्वेलची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. सिनेप्रेमींना 'रेड २'साठी  (Raid 2) जास्त वेळ वाट पाहावी लागणार नाही.

'रेड २' लवकरच थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे. थिएटरमध्ये येण्यापूर्वीच 'रेड २' कोणत्या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रसारित होईल हे उघड झाले आहे. अजय देवगणच्या चित्रपटाचा फर्स्ट लूक पोस्टर प्रदर्शित झाला आहे. यामध्ये अभिनेता आयआरएस अधिकारी अमय पटनायकच्या भूमिकेत दिसत आहे. पोस्टर शेअर करताना कॅप्शनमध्ये लिहिले होते, 'नवीन शहर, नवीन फाईल आणि अमय पटनायक यांचा एक नवीन छापा'. जर 'रेड २'च्या नवीन पोस्टरकडे लक्षपूर्वक पाहिलं तर तुम्हाला दिसेल की त्याखाली ओटीटी प्लॅटफॉर्मचे नाव लिहिलेलं आहे. अर्थातच निर्मात्यांनी सिनेमाचे ओटीटी अधिकार हे नेटफ्लिक्सला विकले आहेत. 

 हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. पण, नेमकी तारीख सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर स्पष्ट होईल. त्यासाठी थोडी वाट पहावी लागेल. राज कुमार गुप्ता दिग्दर्शित 'रेड २'  मध्ये अजय देवगण, वाणी कपूर आणि रितेश देशमुख यांच्या प्रमुख भूमिका आहेत. रितेशने खलनायकाची भूमिका साकारली आहे. यामुळे अजय आणि रितेशमध्ये संघर्ष दिसून येणार आहे. 'रेड २' हा येत्या १ मे २०२५ रोजी थिएटरमध्ये प्रदर्शित होणार आहे.  

टॅग्स :अजय देवगणबॉलिवूडरितेश देशमुख