Join us
Daily Top 2Weekly Top 5

फक्त एका व्यक्तीला इन्स्टाग्रामवर फॉलो करते ऐश्वर्या राय, पाहा कोण विश्वसुंदरीचं फेवरेट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 7, 2023 18:35 IST

ऐश्वर्या आपल्या फिल्मी करीअर आणि पर्सनल लाईफमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली आहे.

विश्वसुंदरी अर्थात ऐश्वर्या राय बच्चन फक्त दिसायलाच सुंदर नसून, अभिनय, अभ्यास यासह विविध भाषांमध्ये निपुण आहे. तिने आजतागायत अनेक चित्रपटांमधून आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवलं. ऐश्वर्याने आपल्या अभिनयाची जादू फक्त बॉलीवूडमध्ये दाखवली नसून, हॉलीवूडमध्येही तिचा जलवा पाहायला मिळतो. ऐश्वर्या आपल्या फिल्मी करीअर आणि पर्सनल लाईफमुळे नेहमीच लाईमलाईटमध्ये राहिली. सोशल मीडियावरही ती चांगलीच सक्रिय असते. 

सोशल मीडियावर विश्वसुंदरीच्या चाहत्यांची संख्या फार मोठी आहे. पण, ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर फक्त एकाच व्यक्तीला फॉलो करते. ती व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून पती अभिषेक बच्चन आहे.  ऐश्वर्याने इन्स्टाग्रामवर आतापर्यंत ३३० पोस्ट केल्या आहेत. तर ऐश्वर्या इन्स्टाग्रामवर 13.3 मिलियन फॉलोवर्स आहेत. 

 ऐश्वर्या आणि अभिषेक कायमच त्यांच्या खाजगी आयुष्यामुळे चर्चेत असतात. अलीकडेच  त्यांच्या घटस्फोटाच्या चर्चा जोर धरु लागल्या आहेत. नुकताच अभिषेक बच्चन एका कार्यक्रमात आला होता. यामध्ये त्याच्या बोटात अंगठीच दिसली नाही.  अभिषेक बच्चनच्या बोटात आतापर्यंत नेहमीच अंगठी दिसली आहे. मात्र अभिषेकच्या बोटातून अंगठीच गायब असल्याचं बघून नेटकऱ्यांमध्ये गॉसिप सुरु आहेत.  बच्चन कुटुंबियांकडून अद्याप यावर स्पष्टीकरण देण्यात आलेलं नाही.

टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडअभिषेक बच्चन