Join us
Daily Top 2Weekly Top 5

लेक आराध्याला सतत सोबत का घेऊन जाते? अखेर ऐश्वर्या रायने सोडलं मौन, म्हणाली, "माझ्यासाठी..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2025 13:34 IST

लेक आराध्याबद्दल ऐश्वर्या राय बच्चन म्हणाली...

'विश्वसुंदरी' ऐश्वर्या राय बच्चन सध्या अनेक कारणांनी चर्चेत आहे. ऐश्वर्या आजकाल अनेक इव्हेंट्समधून समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी ती श्री सत्यसाईबाबांच्या जन्मशताब्दीनिमित्त सोहळ्यासाठी आली होती. तिथे पंतप्रधान नरेंद्र मोदींसमोर भाषणही केलं. तर आता ऐश्वर्या नुकतीच जेद्दाह येथे आयोजित रेड सी इव्हेंटमध्ये पोहोचली होती. तिथे तिने मुलाखतही दिली. यावेळी ऐश्वर्याला ती सतत लेक आराध्याला प्रत्येक ठिकाणी का घेऊन जाते आणि तिचा हात धरुन का असते असा प्रश्न विचारण्यात आला. यावर तिने काय उत्तर दिलं वाचा 

फिल्म फेस्टिवल असो किंवा एखादा इव्हेंट किंवा अवॉर्ड फंक्शन, विमानतळ असो किंवा मुंबईतील एखादं ठिकाण ऐश्वर्याची लेक आराध्या कायम सावलीसारखी सोबत असते. यावर ऐश्वर्या म्हणाली,"आराध्या माझ्यासोबत अनेक ठिकाणी आली आहे. मी तिला प्रत्येक वेळी कान्स फिल्म फेस्टिव्हललाही नेलं आहे. आता तिलाही कान्स पुरेपूर ओळख झाली आहे. आराध्याला छानसा गाऊन घालून मी तिला फेस्टिवलला घेऊन जायचे. तिथे तिचे फोटो काढले जातील म्हणून मी हे केलं नाही. पण माझ्यासाठी ती छोटी मुलगी आहे जी फेअर टेल स्टोरीज वाचते आणि पाहते. मी माझ्या आनंदासाठी तिला छान तयार करते. ती फक्त एक छोटी मुलगी आहे जी सगळ्या गोष्टींचा आनंद घेत आहे. ती मला म्हणजेच तिच्या आईला तयार झालेलं पाहते, हेअरस्टाईल करताना पाहते. आम्ही फेअरी टेलमध्ये आहोत असं मी तिच्यासोबत वागते. मग आम्ही आमच्यासाठी भारतातच ड्रेस तयार करतो आणि पॅक करुन घेऊन जातो."

ती पुढे म्हणाली, "आम्ही एकमेकींचे अनेक व्हिडीओ कॅमेऱ्यात रेकॉर्ड करतो. मी जर ते व्हिडीओ दाखवले तर तुम्हालाही हसू येईल एवढे मनोरंजक आहेत.एकीकडे मी रेड कार्पेटसाठी तयार होत असते तर दुसरीकडे आमची अशई मजाही सुरु असते. माझी टीम प्रोफेशनली त्यांचं काम करत असतो आणि आराध्या मला 'मम्मा हे बघ...'  असं म्हणत ती तिच्या धुंदीत असते."

"काही ठिकाणी आराध्या माझा हात पकडून बाहेर पडताना कॅमेऱ्यात दिसली. ती मस्त एन्जॉय करत होती आणि मीही तिचा हात पकडून होते. ती तिच्या क्युट ड्रेसमध्ये गोल फिरत होती. हे खूप नॅचरल आहे.  तिचे हेच व्हिडीओ व्हायरल झाले पण माझ्यासाठी तो आमचा आई आणि मुलीचा साधा, गोड क्षण होता", असंही ती म्हणाली.

English
हिंदी सारांश
Web Title : Aishwarya reveals why she always takes Aaradhya with her.

Web Summary : Aishwarya Rai Bachchan explained why daughter Aaradhya accompanies her everywhere. Aaradhya enjoys film festivals and dressing up. Their moments together, even amidst red carpet events, are precious and natural, filled with fun and mother-daughter bonding.
टॅग्स :ऐश्वर्या राय बच्चनबॉलिवूडसोशल मीडिया